Gold Rate Today : गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीचा भावही घसरला, 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर काय?
Gold Price Today : सोन्याच्या दरात सलग दोन दिवस घसरण झाली आहे. यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी सोन्याच्या किमतीने 64,250 रुपये सर्वोच्च पातळी गाठली होती.
Gold Silver Rate Today, 30 December 2023 : नवीन वर्षाआधीच चांगली बातमी मिळाली आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली. यापूर्वी 28 डिसेंबर 2023 रोजी सोने 64,250 रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती. सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (Gold Price Today) दरात चढ-उतार कायम असला तरी, त्याला (Gold Price Today) मोठी मागणी आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर, आज सोन्याचा चांदीची किंमत काय आहे, हे येथे जाणून घ्या.
वर्षाच्या शेवटी सोने-चांदीच्या दरात दिलासा
सोन्या-चांदीच्या किंमती वर्षाच्या शेवटच्या दिवसांत घसरल्या आहेत. शुक्रवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झालं. त्यात आज म्हणजेच शनिवारी, 30 डिसेंबरलाही सोन्याच्या दरात घट झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,550 रुपये आहे. आहे. 28 डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.
आज सोन्याच्या दरात घसरण
आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Price Today) 5855 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) 6387 रुपये प्रति ग्रॅम आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Price Today) 47,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ
आज शनिवारी चांदीचा भाव 300 रुपयांनी वाढला असून चांदीचा दर 78,600 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीत चांदीचा दर 1200 रुपयांनी घसरून 78,300 रुपयांवर आला होता. चेन्नईमध्ये एक किलो चांदीचा दर 80,000 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत देशात सर्वाधिक आहे.
देशातील चार प्रमुख महानगरांमधील सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 450 रुपयांनी महागली असून आजचा सोन्याचा दर 64470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 81000 रुपयांवर पोहोचली आहे.
- दिल्लीत आज सोन्याची किंमत 63970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 78600 रुपये प्रति किलो आहे.
- मुंबईत सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली असून आज सोन्याचा दर 64250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 79500 रुपये आहे.
- कोलकातामध्ये सोन्याची किंमत 430 रुपयांनी वाढली असून आजचा सोन्याचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 78600 रुपयांवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)