Gold Silver rates : आठवड्याच्या सुरूवातीला सोने चांदीच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या महानगरांतील दर
Gold Silver rates 31 october 2022 : गेल्या आठवड्याभरातील सोने दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Gold Silver rates 31 october 2022 : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोने-चांदीची (Gold-Silver Rate) खरेदी केली. या कालावधीत सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. याचाच फायदा घेत अनेक ग्राहकांनी संधीचं सोनं केलं. मात्र आजच्या आठवड्याची काहीशी सोनेरी सुरूवात पाहायला मिळाली. कारण आज सोने चांदीच्या दरात किंचित वाढ पाहायला मिळत आहे, जाणून घ्या तुमच्या शहरात सोने-चांदीचा भाव काय?
आजचा सोने-चांदीचा भाव (Gold-Silver Rate Today 31st October 2022)
इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या (IBJ) संकेतस्थळानुसार, सोमवारी म्हणजेच आज सोन्याचे दर 22 कॅरेटसाठी 46,900 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेटसाठी 51,160 रुपये प्रति तोळा नोंदवण्यात आले. गेल्या सोमवारी हे दर अंदाजे 50,444 रुपये प्रति तोळा असे होते. गेल्या आठवड्याभरातील सोने दर वाढीचा आलेख पाहता त्यात अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोने दर
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट(रु.प्रति तोळा )
मुंबई 46750 51000
पुणे 46780 51031
नवी दिल्ली 46900 51160
कोलकाता 46750 51000
बंगळूरु 46800 51050
हैदराबाद 46750 51000
केरळ 46750 51050
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे चांदीचे दर :
शहर किंमत (रु.प्रति किलो)
मुंबई 57500
पुणे 57500
नवी दिल्ली 57500
कोलकाता 57500
बंगळूरु 57500
हैदराबाद 63000
केरळ 63000
बडोदा 57500
चेन्नई 63000
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :