एक्स्प्लोर

Gold Silver Rate : चांदीचे दर 2400 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेली घसरण कायम आहे. आज देखील सोन्याचे आणि चांदीचे दर घसरले आहेत.

Gold Rate Update नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया यूक्रेन यांच्यातील युद्ध चर्चेच्या माध्यमातून थांबवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे भेट झाल्याचे परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव कमी होत असल्यानं गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भांडवली बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे. चांदीचे दर आज 2400 रुपयांनी घसरले आहेत. तर, सोन्याच्या दरात 365 रुपयांची घसरण झाली आहे. 8 ऑगस्टला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, 24 कॅरेट सोन्याचा दर त्यावेळी 101406 रुपयांवर होता, त्यानंतर सोनं 2603 रुपयांनी कमी झालं आहे. सर्राफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 101767 रुपये एक तोळा इतका आहे. 

24 कॅरेट सोन्याचे दर 365 रुपयांनी कमी झाले आहेत. तर, चांदीचे दर 2400 रुपयांनी कमी होऊन 111225 रुपये किलोवर आले आहेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा दर 114561 रुपये इतका आहे. आयबीजेएच्या दरांनुसार चांदीचा जीएसटीशिवायचा दर 113625 रुपये आहे. तर, 24 कॅरेटचा एका तोळ्याचा दर 99168 रुपये इतका आहे. 

23 कॅरेट सोनं देखील 365 रुपयांनी कमी होऊन 98407 रुपयांवर आलं आहे. जीएसटीसह याचा एका तोळ्याचा 101359 रुपये आहे. हा दर मेकिंग चार्जेश शिवाय आहे. 22 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 334 रुपयांची घसरण होऊन ते 90504 रुपयांवर आलं. जीएसटीसह हा दर 93219 रुपये आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 274 रुपयांची घसरण होऊन किंमत 74102 रुपये झाली. 

मुंबईसह विविध शहरांमधील सोन्याचे दर 

मुंबई, बंगळुरु, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 91800 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 100150 रुपये इतका आहे. तर, नवी दिल्ली आणि लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 91950 रुपये आहे, तर 24 कॅरे सोन्याचा दर 100300 रुपये इतका आहे. 

अहमदाबाद आणि इंदोरमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 91850 रुपये इतका आहे. तर ,24 कॅरेट सोन्याचा दर 10020 रुपये एक तोळा इतका आहे. सोन्याची मागणी घटल्यानं देशभरात दरात घसरण झाली आहे. कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 91800 रुपये एक तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा दर 100150 रुपये आहे.

सर्राफा बाजारात 2025 मध्ये सोन्याच्या दरात 23063 रुपयांची दर चांदीच्या दरात 25208 रुपयांची वाढ झाली. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा  एका तोळ्याचा दर 75740 रुपये तर चांदीचा दर 86017 रुपये किलो होता. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget