Gold Silver Rate Today : सणासुदीत सोन्याच्या दरात उसळी, चांदीच्या भावातही वाढ; आजचे दर जाणून घ्या
Gold Silver Rate Today : बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली होती.
Gold Silver Rate Today : सराफा बाजारात सध्या सोन्याची (Gold Price) चमक वाढलेली दिसत आहे. सोने आज तेजीसह व्यवहार करताना दिसत आहे. बुधवारी दसऱ्याच्या (Dusshera 2022) मुहूर्तावर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्रीही दिसून आली.
आज सोने-चांदीचा भाव काय?
आज सोन्याचा भाव पाहता 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झेप घेतली असून, 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,750 रुपये आहे, तसेच 10 ग्रॅम चांदीचा दर 620 रुपये आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील शहर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव
मुंबई - 47,850, 52,200 चांदी - 61500 किलो
पुणे - 47,880, 52,230 चांदी - 61500 किलो
नागपूर - 47,880, 52,230 चांदी - 61500 किलो
नाशिक -47,880, 52,230 चांदी - 61500 किलो
नई दिल्ली - 48,000, 52,360 चांदी - 61500 किलो
कोलकाता - 47,850, 52,200 चांदी - 61500 किलो
बेंगलुरु - 47,900,52,250 चांदी - 66500 किलो
हैदराबाद - 47,850, 52,200 चांदी - 66500 किलो
केरळ - 47,850, 52,200 चांदी - 66500 किलो
अहमदाबाद - 47,900, 52,250 चांदी - 61500 किलो
जयपुर - 48,000, 52,360 चांदी - 61500 किलो
लखनऊ - 48,000, 52,360 चांदी - 61500 किलो
सूरत - 47,900, 52,250 चांदी - 61500 किलो
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Price Today: दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? जाणून घ्या आजचे दर
- Elon Musk : एलॉन मस्क ट्विटर खरेदी करणार? खटल्यावरील सुनावणी आधी मस्क यांच्याकडून ट्विटरला ऑफर