Gold Silver Rate : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण; वाचा महत्वाच्या शहरातील दर
सोने किंवा चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Gold Silver Rate Today : सोने किंवा चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver ) दरात घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आज बाजारात सोन्याचा दर 58 हजार 275 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत हा दर कमी आहे. काल प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 58 हजार 432 रुपये द्यावे लागत होते. आज दरात 157 रुपयांची म्हणजेच 0.27 टक्क्यांची घसरण झाली आहे.
आज बाजारात सोन्याचे दर 58,275 रुपयांवर
तुम्ही जर आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज बाजारात सोन्याचे दर हे 58,275 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. हा दर कालच्या तुलनेत 157 रुपयांनी कमी आहे. त्यामुळं सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
चांदीच्या दरातही घसरण
सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. काल चांदीचे दर हे प्रतिकिलो 71 हजार 777 रुपयांवर होता. तर आज यामध्ये घसरण झाली आहे. आज चांदचा दर हा 71 हजार 323 रुपये प्रति किलोवर गेला आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 454 रुपये म्हणजे 0.63 टक्क्यांची नी घसरन दिसली आहे. त्यामुळं चांदी खरेदी करणारांसाठी ही महत्वाची बाब आहे.
जाणून घ्या मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर?
चेन्नई- 24 कॅरेट सोने 59,780 रुपये, चांदी 77,000 रुपये किलो दराने विकली जात आहे.
मुंबई- 24 कॅरेट सोने 59,450 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
दिल्ली- 24 कॅरेट सोने 59,600 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 59,450 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 59,450 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 59,600 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 59,500 रुपये, चांदी 74,200 रुपये किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 59,600 रुपये, चांदी 74,200 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 59,600 रुपये, चांदी 74,200 रुपये प्रति किलो
इंदूर- 24 कॅरेट सोने 59,500 रुपये, चांदी 74,200 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारातही मंदी
देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.46 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: