एक्स्प्लोर

Gold Rate : सोने 5 दिवसांमध्ये 4919 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात उच्चांकाच्या तुलनेत 2 लाखांची घसरण, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात 8 ते 12 जून दरम्यान घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर जानेवारीतील  उच्चांकावरुन 2.10 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 

नवी दिल्ली : भारतात 8 जून ते 12 जून या पाच दिवसांच्या कालावधीत मोठी तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. या पाच दिवसांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसात सोने आणि चांदीचे दर घसरले तर अखेरच्या टप्प्यात दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाच दिवसांमध्ये सोने आणि चांदी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्यानं जानेवारी महिन्यात चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सध्या चांदी 2.10 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर, या पाच दिवसांच्या कालावधीत सोनं 4919 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 

MCX वर सोने चांदी दरात घसरण

सोन्याच्या दरात 8 जून ते 12 जून या कालावधीत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 5 ऑगस्टच्या एक्सपायरीच्या वायद्याचा दर 1 लाख 55 हजार 594 रुपयांनी घसरुन 1 लाख 50 हजार 675 रुपयांपर्यंत आला. म्हणजेच सोन्याचा दर पाच दिवसात 4919 रुपयांनी घसरला. जानेवारी महिन्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 2 लाख 4 हजार 375 रुपयांपर्यंत धडक दिली होती. त्या तुलनेत सोन्याचा दर 53700 रुपयांनी कमी झाला आहे. तर, गेल्या दहा दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. 29 मे रोजी एमसीएक्सवर सोन्याचा दर 1 लाख 60 हजार रुपयांवर होता. तो 12 जूनला 1 लाख 50 हजार 675 रुपयांवर आला आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 3 जुलैच्या वायद्याच्या चांदीच्या दरात अखेरच्या दोन दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली. 5 जूनला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा एक किलोचा दर 248537 रुपये होता. तर, शुक्रवारी म्हणजेच 12 जूनला चांदीचा दर 2 लाख 46 हजार 604 रुपयांवर होता. म्हणजेच चांदी 1933 रुपयांनी स्वस्त झाली. 

जानेवारी महिन्यात चांदीच्या दरानं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 लाखांचा टप्पा पार केला होता. चांदीचे दर 4 लाख 57 हजार 328 रुपयांवर पोहोचला होता. त्यांनतर चांदीच्या दरात सातत्यानं घसरण सुरु आहे. तेव्हापासून चांदीचा दर 2 लाख 10 हजार 724 रुपयांनी कमी झाला आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 5 जूनला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 154238 रुपयांवर होता. तो 12 जूनला 1 लाख 47 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात 6438 रुपयांची घसरण झाली. तर, 5 जूनला चांदीचा दर 2 लाख 56 हजार 908 रुपयांवरुन 14513 रुपयांनी कमी होऊन 242295 रुपयांवर आले. सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याज दर उच्च राहण्याचे संकेत असल्यानं गुंतवणूकदार अधिक परताव्यासाठी सोन्यापासून दूर जाणं ही देखील कारणं आहेत.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget