Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; जाणून घ्या आजच्या किंमती
Gold Silver Price Today : सध्या सोन्याची किंमत आवाक्यात असून येत्या काळात त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

मुंबई : कालच्या घसरणीनंतर आज सोन्या-चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या किंमतीत अगदीच किरकोळ म्हणजे 10 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,850 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,850 रुपये इतका आहे. एक किलो चांदीसाठी आता 66,400 रुपये मोजावे लागणार आहेत.
बुधवारी सोन्याच्या दरात 180 रुपयांची वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांचा विचार करता 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले. त्यानंतर 27 जुलैला पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याची किंमत आवाक्यात असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
चांदीच्या दराचा विचार करता गेल्या महिन्यापासून त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi Twitter Followers: ट्विटरवरही पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते, फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर
- लाखोंचे प्राण वाचवणारे स्वतः मात्र असुरक्षित; टीडीआरएफ जवान अजूनही कंत्राटी कर्मचारीच
- Ind vs SL 2nd T20I : दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा श्रीलंकेकडून चार विकेटने पराभव
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या






















