(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Twitter Followers: ट्विटरवरही पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते, फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर
ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन म्हणजे सात कोटी इतकी झाली आहे.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता वाढतच आहे. पंतप्रधान मोदी हे आता ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते बनले आहेत. त्यांच्या फॉओअर्सनी 70 मिलियन म्हणजे सात कोटींचा टप्पा पार केला आहे. त्या आधी हे रेकॉर्ड अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे होतं.
ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर 88.7 मिलियन म्हणजे 8 कोटी 87 लाख फॉलोअर्स होते. त्यावेळी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर होते, त्यानंतर मोदींची क्रमांक लागत होता. त्यावेळी मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 64.7 मिलियन म्हणजे 6 कोटी 47 लाख इतकी होती. आता त्यामध्ये मोठी वाढ झाली असून मोदींच्या फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर गेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी आणण्यात आल्याने पंतप्रधान मोदी आता ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असलेले राजकीय नेते बनले आहेत.
पंतप्रधान मोदी हे गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान ट्विटर, यूट्यूब आणि गुगल सर्चवर ट्रेंडिंग चार्टमध्ये सर्वाधिक वरच्या क्रमांकावर होते. ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सर्च केले जाणारे राजकीय नेते आहेत. आताही ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सनी सात कोटींचा टप्पा ओलांडला हे त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे संकेत आहेत.
इतर राजकीय नेत्यांचा विचार करता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटरवर एक कोटी 94 लाख इतके फॉलोअर्स आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या फॉलोअर्सची संख्या ही 60 लाख इतकी आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटी 28 लाख, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फॉलोअर्सची संख्या ही एक कोटी 45 लाख इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या :