Gold Silver Price : सोन्याचा भाव 'जैसे थे' तर चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ
Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 48,240 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 49,240 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,900 रुपये इतका आहे.
नवी दिल्ली : बुधवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचा भावात किरकोळ म्हणजे 10 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलंय तर चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसघशीत वाढ झाल्याचं पहायला मिळालंय. आज मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 48,240 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 49,240 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव हा 72,900 रुपये इतका आहे.
मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याच्या भावात अचानक 1330 रुपयांची वाढ झाली आणि ते 49,230 रुपयांवर पहोचलं. आता त्यात केवळ 10 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्या आधी दोन दिवस, 31 मे रोजी 110 रुपयांची आणि 1 जून रोजी 200 रुपये वाढ झाली होती. 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. 26 मेला अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला. 27 तारखेला पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर 28 मे रोजी 110 रुपयांची घट, 29 मे रोजी 90 रुपयांची वाढ, 30 मे रोजी 10 तर 30 मे रोजी 110 रुपयांची वाढ झाली.
आज चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ होऊन तो 72,900 इतका झाला आहे. त्या आधी बुधवारी चांदीच्या किंमतीत 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं. 1 जून रोजी 600 रुपयांची वाढ तर 31 मे रोजी 400 रुपयांची वाढ झालेली दिसून येतंय. सोन्याच्या तुलनेत चांदीचा भाव हा सातत्याने वाढताना दिसत आहे.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :