गेल्या 24 तासात सोन्या चांदीच्या दराची स्थिती काय? कोणत्या शहरात किती दर? जाणून घ्या सविस्तर माहिती
सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या सोन्याचे दर स्थित आहेत, तर चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे.

Gold Silver Price in India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 2 एप्रिलपासून अमेरिकेत आयात होणाऱ्या कार आणि ऑटो पार्ट्सवर 25 टक्के शुल्क लागू करणा आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात घबराटीचे वातावरण आहे. सोन्याचे भाव वाढत असल्याची परिस्थिती आहे. इंडियन बुलियन असोसिएशनच्या (IBA) आकडेवारीनुसार, 28 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 81,492 रुपये आहे. मात्र, गेल्या 24 तासांपासून सोन्याचे दर स्थिर आहेत.
चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. 28 मार्च रोजी 1 किलो चांदीची किंमत 91,503 रुपये झाली आहे. MCX निर्देशांकावर 86 रुपयांच्या वाढीसह 1 किलो चांदीची किंमत 1,01,399 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद सारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये आज सोन्याचा भाव काय आहे ते पाहूयात.
कोणत्या शहरात सोन्याचे किती दर?
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,510 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,000 रुपयांना विकली जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 82,360 रुपये आहे, तर त्याच ग्रॅमच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,850 रुपये आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम 82,360 रुपयांना तर 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 89,850 रुपयांना विकले जात आहे.
कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 82,360 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 89,850 रुपये आहे.
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 82,360 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 89,850 रुपये आहे.
बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 82,360 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,850 रुपये आहे.
पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 82,410 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,900 रुपये आहे.























