Gold Rates Today : सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ, जाणून घ्या तुमच्या भागातील दर
सोन्याचा दर आज किलोमागे एक हजार रुपयांनी वाढला आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,250 रुपये आहे
नवी दिल्ली : आज जर तुम्ही सोने खरेदीसाठी जाणार असाल तर त्या आधी जाणून घ्या तुमच्या भागातील सोन्याचे भाव. कारण सोमवारी (ता. ८) आंतराष्ट्रीय बाजारात (international gold market) सोन्याच्या (gold rates today) भावात 1000 रुपयांनी वाढ तर, चांदीच्या भावात किंचीत घसरण पाहायला मिळत आहे. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने- चांदीचे भाव.
सोन्याच्या दरात किलोमागे एक हजार रुपयांनी वाढ
सोन्याचा दर आज किलोमागे एक हजार रुपयांनी वाढला आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,250 रुपये आहे. 5 फेब्रुवारी 2022 पासून सोन्याचा दर स्थिर होता. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 45,200 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 49,300 रुपये आहे, जो राष्ट्रीय दरापेक्षा किंचित जास्त आहे.
मुंबईत सोन्याचा दर वाढला
मुंबईतही आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी अनुक्रमे 45,200 आणि 49,250 रुपये होता. चेन्नईत मात्र 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 45,390 रुपये आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,520 रुपये असताना काहीसा वाढला.
या आठवड्यात दिसणार अस्थिरता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीमुळे या आठवड्यात भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता दिसण्याची अपेक्षा आहे. ही बैठक ७ फेब्रुवारीला होणार होती, पण गायिका लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआयने रात्री रिव्हर्स रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Adani Wilmar IPO: अदानी समूहात गुंतवणूक करण्याची संधी, आजपासून Wilmar आयपीओ खुला
- Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला
- SBI MF Scheme : कमाईची उत्तम संधी! एसबीआयच्या नवीन म्युच्युअल फंडात SIP सह गुंतवणुकीची संधी
- म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा