एक्स्प्लोर

Gold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याचे दर कमी होणार का? तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं? जाणून घ्या

Gold Rate : अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामानिमित्त सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याची मागणी घटू शकते. 

नवी दिल्ली : अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोन्याचे दर 1 लाखांच्या वर गेले आहेत.गेल्या आठवड्यात 22 एप्रिलला देखील सोन्याचे दर 1 लाखांच्या वर गेले होते. अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं सोने आणि चांदी खरेदी करणं चांगलं मानलं जातं. गेल्या दोन वर्षात अक्षय्य तृतीयेला ज्यांनी सोनं खरेदी केलं असेल त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळं यंदा देखील अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीचा उत्साह कायम आहे. 

जेम अँड ज्वेलरी काऊन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश रोकडे यांनी एएनआय सोबत बालताना म्हटलं की गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्यानं 20-25 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळं लोकांचा सोन्यामधील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. ते म्हणाले 2024  मध्ये अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 72000 रुपये इतका होता.  तर, 2023 मध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 58000 रुपये इतका होता. सोन्यामधील गुंतवणुकीमुळं गेल्या दोन वर्षांमध्ये साधारणपणे 20-25 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. यामुळं सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. 


राजेश रोकडे पुढं म्हणाले की 2024 मध्ये भारतानं 802 टन सोनं आयात केलं आहे. 2023 मध्ये भारतानं 741 टन सोनं आयात केलं होतं. सोन्याचे दर वाढत असले तरी मागणी देखील वाढत आहे. ज्वेलर्सकडून आगामी हंगामाची तयारी केली जात आहे. पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी म्हटलं की अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामामुळं मागणी वाढली आहे.  यादरम्यान सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळं स्टड ज्वेलरीची मागणी वाढू शकते, असं सांगण्यात आलं. ग्राहकांकडून जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करत आहेत. 


कमोडिटी विश्लेषकांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरातील वाढ सुरु आहे. मात्र, येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचेदर कमी होऊ शकतात. केडिया एडवायजरीचे संचालक अजय केडिया यांनी म्हटलं की गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेनंतर सोन्यातील गुंतवणूकीनं 32 टक्के परतावा दिला आहे. मात्र, सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा लग्नसराई यासारख्या कारणासाठी सोनं खरेदी कराव. महागाईचा विचार केला असता त्यातून मिळणारा परतावा 6 ते 7 टक्के असू शकतो. यामुळं सोन्याचे दर 86000 ते 87000 रुपयांच्या दरम्यान राहू शकतात अशी अपेक्षा आहे.

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर; जाणून घ्या, आजचा दर

Gold Rate : सोन्याचे दर 27000 रुपयांनी घसरणार, भारतात 10 ग्रॅम सोन्याचा दर 70 हजारांवर येणार, बड्या कंपनीचा मोठा दावा

महत्त्वाच्या बातम्या

Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget