एक्स्प्लोर

Gold Rate : सोन्याचे दर 27000 रुपयांनी घसरणार, भारतात 10 ग्रॅम सोन्याचा दर 70 हजारांवर येणार, बड्या कंपनीचा मोठा दावा

Gold Rate : भारतात सोन्याचे दर 22 एप्रिलला 1 लाखांच्या वर गेले होते. त्यानंतर सोने दरात घसरण झाली आहे. सॉलिडकोर रिसोर्सेस पीएलसी या कंपनीनं दर घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : भारतात सोन्याच्या दरांनी गेल्या आठवड्यात 1 लाखांचा टप्पा पार केला होता, त्यानंतर दरांमध्ये थोडीशी घसरण झाली होती. काही संस्थांकडून सोन्याचे दर पुढच्या वर्षापर्यंत 1 लाख 6  हजार रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, एका कंपनीनं भारतात सोन्याचे दर 70 हजार रुपयांवर येतील असा दावा केला आहे. म्हणजेच सोन्याचे दर 27000 रुपयांनी घसरतील. 

कझागिस्तानमधील सोन्याच्या खाणकामातील नामांकित कंपनी सॉलिडकोर रिसोर्सेसचे सीईओ विटाली नेसिस यांनी एक मोठा आणि आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. त्यांच्या मते पुढील 12 महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळेल. विटाली यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की पुढील वर्षात सोनं 2500 डॉलर प्रति औंसवर आलेले असतील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3319 डॉलर प्रति औंस इतके आहेत. विटाली नेसिस यांच्या मते सोन्याचे दर 25  टक्क्यांनी घसरतील. 

जगभरात ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा परिणाम प्रतिक्रिया म्हणून येत असून व्यापार युद्ध आणि  जगभरातील राजकीय संघर्षाच्या मुद्यांमुळं सोन्याचे दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहेत. 

सॉलिड कोर रिसोर्सेस पीएलसी यापूर्वी पॉलीमेटल म्हणून ओळखली जायची. या कंपनीचं मुख्यालय कझागिस्तान येथे आहे. सॉलिड कोर रिसोर्सेस  ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात लिस्ट असलेली मोठी कंपनी आहे. सॉलिड कोर रिसोर्सेस पीएलसी ही कझागिस्तानमधील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. विटाली नेसिस यांच्या अनुभवानुसार,काही अंदाज वर्तवण्यात आले. सोने दरातील तेजी किती दिवस चालू राहील याचा अंदाज घ्यायला हवा. सोने दरातील सध्याची तेजी टिकाऊ नाही. गुंतवणूक दार सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत. 

2025 मध्ये सोन्याचे दर 26 टक्क्यांनी वाढले आहेत. कारण अमेरिका विविध देशांवर टॅरिफ लादला आहे. सध्या ट्रम्प यांनी परस्पर शुल्क आकारणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळं सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे.  

सोने दरात तीन दिवसांपासून घसरण सुरु आहे. एमसीएक्सवर सोनं 4300 रुपयांनी स्वस्त होऊन 95073 रुपयांवर आलं आहे. विटाली नेसिस यांच्या अंदाजानुसार सोन्याचे दर पुढील 12 महिन्यात 25 टक्क्यांनी घसरु शकतात. 

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यपारी संबंध सुधारल्यांनतर त्यामध्ये स्थिरता आल्यानंतर सोन्याची मागणी कमी होऊ शकते. यामुळं गुंतवणूकदारांनी जास्त दरानं सोने खरेदी करण्यापूर्वी सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.  दरम्यान, भारताता अक्षय्य तृतीया आणि  धनत्रयोदशीला सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget