Gold Rates Today : सोन्याच्या दरात 10,000 रुपयांनी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Gold Rates Today : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
Gold Rates Today : आज भारतात सोन्याचे दर (gold rates) 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 10,000 रुपयांनी वाढले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
आज सोन्याचे भाव
आज भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,400 रुपये आणि 24 कॅरेटचा 53,890 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,400 रुपये होता, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 50,710 रुपये होता. केरळमध्ये सोन्याचा दर 49,400 रुपये आहे. रशिया युक्रेन युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. ताज्या रिपोर्टनुसार, S&P ने 52 रशियन कंपन्यांचे रेटिंग कमी केले आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई - 49,400 53,890
पुणे 49,480 53,950
नागपूर 49,550 53,940
नाशिक 49,480 53,950
दिल्ली 49,400 53,890
सुरत 49,450 53,890
केरळ 49,400 53, 890
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा 13 वा दिवस; तिसऱ्या फेरीतील चर्चाही निष्फळ
- Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha