Gold Rates Today : सोन्याच्या दरात 7000 रुपयांनी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (gold rates today) दरात वाढ होताना दिसत आहे.
Gold Rates Today : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या (gold rates today) दरात वाढ होताना दिसत आहे. सोने आणि चांदी (gold and silver) या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीतील ताजी दरवाढ पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.
सोन्याचे दर 7,000 रुपयांनी वाढले
आज भारतात सोन्याचे दर 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 7,000 रुपयांनी वाढले. भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,400 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 52,800 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,400 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 49,700 रुपये, केरळमध्ये सोन्याचा दर 48,400 रुपये आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैन्याने मोठ्या शहरांमध्ये कूच केली आणि प्रमुख इमारतींवर बॉम्बफेक हल्ला केला, यामुळे युक्रेनला आता 10 दिवसांपासून खूप दबावाचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या सोने 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे पोहोचले आहे. रशिया युक्रेनमधील युद्ध सुरु होताच आर्थिक व्यवस्थादेखील ढासळू लागली आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47 हजारांवर होता. एका आठवड्यात सोन्याचा दर आज 53 हजारांच्या पुढे गेला आहे.
आज 5 मार्च 2022 : जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 48,400 52,800
पुणे 48,450 52,850
नाशिक 48,450 52,850
नागपूर 48,500 52,900
दिल्ली 48,400 52,800
कलकत्ता 48,400 52,800
सुरत 48,480 52,880
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या: