Gold Silver Price Today : रशिया-युक्रेन तणावानंतर सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या ताजे दर
Gold Silver Price Today : सोन्याचे दर आज किंचित घसरले आहेत. तर, चांदीमध्येही चांगलीच घसरण दिसून येत आहे.
![Gold Silver Price Today : रशिया-युक्रेन तणावानंतर सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या ताजे दर Gold rate today gold and silver price in on< Date >< add daily trending topics as well Gold Silver Price Today : रशिया-युक्रेन तणावानंतर सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण, जाणून घ्या ताजे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/24/e5e89bb5a60052c66f0897313b7bf094_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीत जोरदार घसरण झाली असून सकाळपासून सोने सुमारे 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी दिसून येत होती. मात्र, आज हा दर काहीसा दिलासादायक आहे. रशिया-युक्रेन तणावामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट दिसून येत आहे.
काय आहेत आजचे सोन्याचे दर ?
आज सोनं काहीसं स्वस्त मिळतंय. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर कमी झालेले दिसूय येत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे एप्रिलचे फ्युचर्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. सध्या एमसीएक्सवर सोन्याचे दर 1.13 टक्क्यांनी घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 583 रुपयांनी खाली आले असून ते सध्या 50,960 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. अशाप्रकारे आज सोने 51,000 पर्यंत खाली आले आहे.
चांदीचे दरही किंचित घसरले
सोन्याच्या किंमतीत घसरण होत असतानाच चांदीचे दरही स्वस्त झाले आहेत. आज चांदीची दर 1200 रुपयांनी कमी झाले असून गुंतवणूकदारांना चांदीत गुंतवणूक आणि खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचे दर 1,217 रुपयांनी किंवा 1.84 टक्क्यांनी घसरले आहेत. चांदीच्या मार्च फ्युचर्सच्या किंमतीवर नजर टाकली तर चांदी 64,814 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- New T+1 Settlement Process : 19 वर्षानंतर शेअर बाजारात मोठे बदल; T+1 सेटलमेंट नियम होणार लागू
- Share Market: शेअर बाजारात त्सुनामी... दलाल स्ट्रीटवर हाहाकार; Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होईल परिणाम; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)