Gold Silver Price Today : सोन्याचा दर 55 हजारांवर, जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold Silver Price Today : रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. सोन्याच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे.
Gold Silver Price Today : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तर होतोच आहे. परंतु, या युद्धाचे पडसाद भारतीय बाजारेपेठेवरही उमटताना दिसतायत. रशिया युक्रेन युद्ध सुरु होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात काहीशी स्थिरता होती. परंतु, युद्धानंतर मात्र बाजारपेठेवर बराच परिणाम झाला आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर.
सोन्या-चांदीचे आजचे दर :
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवरही सोन्या-चांदीच्या दरात सलग वाढ होताना दिसतेय. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर 55,133 रूपये आहे, तर चांदीचा दर प्रति किलो 72,800 रूपये झाला आहे.
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर :
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर पाहता, स्पॉट गोल्डची किंमत 0.6 टक्क्यांनी घसरून $2,040.07 प्रति औंसवर होते. मागील सत्रात $2,069.89 वर वाढल्यानंतर, ऑगस्ट 2020 मध्ये $2,072.49 च्या विक्रमी पातळीपासून काही अंतरावर होते. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी वाढून $2,046.40 वर होते.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला
- Petrol-Diesel Price : काल दरवाढ टळली, आजचं काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर
- Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धाचा भारतीयांना फटका; 'या' गोष्टी महागण्याची शक्यता, खाद्यतेलाचा साठा करण्यात गुंतले लोक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha