Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,890 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे दर gold rate today gold and silver price in on 29th september 2022 gold and silver rate down today marathi news Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा आजचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/549d3eb93f601a2cb57afe510265f12c1664079625032279_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate Today : नवरात्रोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते. तर, आज ग्राहकांना सोने खरेदीसाठी चांगली संधी आहे. कारण, आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,890 रूपयांवर आला आहे. तर, चांदीचे दर देखील 500 रूपयांनी वाढले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 55,960 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 45,733 | 55,960 |
पुणे | 45,733 | 55,960 |
नाशिक | 45,760 | 55,940 |
नागपूर | 45,760 | 57,888 |
दिल्ली | 45,733 | 55,950 |
कोलकाता | 45,824 | 57,810 |
जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर (Global Market Rate) :
स्पॉट गोल्ड 0142 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी घसरून $1,656.59 प्रति औंस झाले. मागील सत्रात सराफा 2 टक्क्यांपर्यंत वाढला होता. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2 टक्क्यांनी घसरून $1,667.10 वर आले. स्पॉट सिल्व्हर 0.4 टक्क्यांनी घसरून $18.82 प्रति औंस, प्लॅटिनम 0.6 टक्क्यांनी घसरून $858.54 आणि पॅलेडियम 1 टक्क्यांनी घसरून $2,134.52 वर आले.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)