Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,570 रूपयांवर आला आहे.
![Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर gold rate today gold and silver price in on 23rd december 2022 gold and silver rate slightly down today marathi news Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/0ccb62058ab333d9cb3d14bf39111db21671775088800358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate Today : मागच्या काही दिवसांत जागतिक बाजारातील डॉलरचे वाढलेले दर तसेच चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग (China Corona Update) याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर झाला. काल सोन्याचे दर 56 हजारांपर्यतं पोहोचले होते. एकूण आकडेवारी पाहता मागच्या पाच महिन्यांतील सोन्याच्या दराने (Gold-Silver Rate) सर्वात मोठी उच्चांक पातळी गाठली होती. त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांनादेखील सोनं खरेदी करणं महागात पडलं होतं. मात्र, आज सोन्याचे दर पाहता ग्राहकांना किंचित दिलासा मिळणार आहे. कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,570 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 68,660 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,570
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,023
1 किलो चांदीचा दर - 68,660
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,570
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,023
1 किलो चांदीचा दर - 68,660
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,570
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,023
1 किलो चांदीचा दर - 68,660
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,570
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,023
1 किलो चांदीचा दर - 68,660
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,500
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,958
1 किलो चांदीचा दर - 68,530
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,520
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,977
1 किलो चांदीचा दर - 68,550
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
शेअर बाजारात पडझड; Landmark Cars आणि Abans Holdings ची लिस्टिंग, गुंतवणूकदारांना किती झाला फायदा?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)