एक्स्प्लोर

Gold Rate : सोने दर उच्चांकी पातळीवर पोहोचले, सोनं 1 लाखांच्या जवळ पोहोचलं, दरातील तेजी राहणार की मंदी येणार?

Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळं शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्यानं सोने दरांमध्ये वाढ झाली आहे.

Gold Rate मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकाकेंद्री आर्थिक धोरणांचा प्रभाव जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफच्या धोरणामुळं जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा विचार करता गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामधील गुंतवणूक वाढवली आहे. परिणामी सोन्याचे दर वाढलेले आहेत. भारताप्रमाणं जागतिक बाजारात देखील सोन्याचे दर वाढले आहेत. भारतात जीएसटीसह सोन्याचे 98 हजारांवर पोहोचले आहेत. तर, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 95 हजारांवर गेले आहेत. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 1 लाख रुपयांपर्यंत अक्षय्य तृतियेपर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. एमसीएक्सवर सोनं सध्या 95000 च्या पुढं आहे म्हणजे पाच हजारांची वाढ झाल्यास सोनं 1 लाखांचा टप्पा पार करेल. 

विश्लेषकांच्या मतानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळं ट्रेड वॉर वाढण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिेकनं चीनवर 245 टक्के आयात शुल्क लादलं आहे. त्यामुळं गुंतवणूकदार जास्त जोखीम असलेल्या शेअर्स, बाँड ऐवजी सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. जगभरातील केंद्रीय बँकांकडून देखील सोन्याची खरेदी सुरु असल्यानं त्याचा सोने दरावर परिणाम झाला आहे. 

बँक ऑफ अमेरिकेच्या अंदाजानुसार कॉमेक्सवर सोन्याचे दर पुढील दोन वर्षात 3500 अमेरिकन डॉलर प्रति औंस इतके राहू शकतात. गोल्डमन सॅचनं  2025 अखेर पर्यंत सोन्याचे दर 3300 अमेरिकन डॉलर प्रति औंस राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बरोबर ठरल्यास भारतात सोन्याचे दर 1 लाख रुपयांचा टप्पा पार करु शकतात. 

रिसर्च फर्म मॉर्निंगस्टारच्या अंदाजानुसार पुढील वर्षांमध्ये सोन्याचे दर 40 टक्के घसरु शकतात. सोन्याचं उत्पादनं वाढलं आहे, मात्र, त्या तुलनेत मागणी वाढलेली नाही, यामुळं सोन्याचे दर घसरु शकतात. मॉर्निंगस्टारचे अंदाज खरे ठरल्यास सोन्याचे दर भारतात 55000 ते 56000 हजारांवर येतील.  यावर कमोडिटी एक्सपोर्ट अनिल पटेल यांनी जागतिक बाजारात  तणाव नसल्यास हे शक्य होऊ शकेल असं म्हटलं, याबाबत मनीकंट्रोलनं वृत्त प्रकाशित केलंय. यासाठी शेअर बाजारात तेजी देखील असली पाहिजे. मात्र, सध्या तसं चित्र दिसून येत नाही. 

दरम्यान, सोन्याचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचले असू न मुंबईतील दर 98 हजांच्या पार गेल आहे. मुंबईतील एक तोळे सोन्याचा दर 98066 रुपय इतका आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget