Gold Price : सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या; लवकरच गाठणार लाखाचा टप्पा? जीएसटीसह आजचे दर किती?
Gold Price : गेल्या आठवड्यात ट्रम्प सरकारच्या टेरिफ धोरणाचे पडसाद सोने दरावर होऊन घसरण झाली होती. मात्र बुधवारपासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

Gold Price : गेल्या आठवड्यात ट्रम्प सरकारच्या टेरिफ धोरणाचे पडसाद सोने दरावर (Gold Price) होऊन घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात घसरण दिसून आली. मात्र बुधवारपासून सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचा भाव दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 96 हजार रुपयांवर पोहोचला असून लवकरच तो एक लाख रुपयांचा टप्पा गाठणार, असा अंदाज व्यक्त केला जातोय. वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
शुक्रवारी अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या बाजारात मोठी लगबग असते. त्यातच अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलेच भडकले थेट परिणाम सोन्यासह चांदीच्या दरावर दिसून आला. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव 95,550 रुपयांवर पोहोचल्याच्या दिसून आले होते. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर तिथेही सोन्याचे भाव वाढले होते. मुंबईत सोने महाग झाले आहे.
आजचे दर किती?
सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 96 हजार रुपयांवर पोहोचला असून लवकरच तो एक लाख रुपयांचा टप्पा गाठणार, असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर जळगावच्या सराफ बाजारात शनिवारी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 85,436 प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी 93,200 रुपये (जीएसटीसह 95,996) पोहोचला आहे. तर जळगावात चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 95000 रुपयांवर पोहोचला आहे. लवकरच सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा गाठणार, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
किंमती वाढण्यामागे काय आहे कारण?
दरम्यान, चीन-अमेरिकेतील व्यापारविषयक मतभेद आणि टॅरिफ युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढतो आहे. काही काळ दर नरमावले असले तरी नव्याने उफाळलेल्या संघर्षामुळे पुन्हा सोन्याची किंमत उसळू लागली आहे. व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतासह जगभरातील वायदे बाजारात सोन्याला मागणी वाढली आहे. जागतिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोने खरेदीसाठी गर्दी करत असल्याने गत दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत ठेवींचे घटलेले दर यामुळे हमखास गुंतवणूक देणाऱ्या सोन्याला मागणी वाढली आहे.
आणखी वाचा























