Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?
Gold Price Today: भारतीय फ्युचर्स मार्केट (MCX) वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 113 रुपयांच्या (0.15%) वाढीसह 73,215 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करतंय. तर काल (15 मे) सोन्याचे दर 73,102 रुपयांवर बंद झाले होते.
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price Today) दरांना पुन्हा एकदा तेजी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याचे दर 800 रुपयांनी तर चांदीचे दर 1500 रुपयांनी वधारले होते. तर आज गुरुवारी (16 मे) सोने आणि चांदी दोघांच्या दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय फ्युचर्स मार्केट (MCX) वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर 113 रुपयांच्या (0.15%) वाढीसह 73,215 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास व्यवहार करतंय. तर काल (15 मे) सोन्याचे दर 73,102 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 375 रुपये (0.43%) च्या तेजीसह 87,240 रुपये प्रति किलोग्रामवर व्यवहार करतेय. बुधवारी चांदीचे दर 86,865 रुपयांवर होते.
देशांतर्गत बाजार असो वा जागतिक सोनं-चांदीच्या दरांत जबरदस्त तेजी
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी सोन्याचे दर 40 डॉलर्सनी वाढून एक महिन्याच्या उंचीसह 2400 डॉलर्सजवळ पोहोचला होता. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात 11 वर्षांनंतर चांदी 30 डॉलरच्या पुढे गेली आहे. भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीच्या वायद्यानं 1500 रुपयांची उसळी घेत 86,975 रुपयांचा उच्चांक गाठला, तर सोन्याचे वायदेही 800 रुपयांनी वाढून 73100 रुपयांच्या जवळ बंद झाले होते.
सोन्या-चांदीच्या दरांत का आलीय तेजी?
यूएस स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 2 हजार 388 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तसेच, यूएस सोन्याचे फ्युचर्स देखील 0.1 टक्क्यांनी वाढून 2,393 डॉलर प्रति औंस झाले आहेत. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा महागाईचे आकडे चांगले आल्यानंतर, डॉलर आणि यूएस 10 वर्षीय रोखे उत्पन्नात मोठी घसरण झाली. त्यानंतर सोन्याचे भाव वाढले. डॉलर निर्देशांक 0.2 टक्क्यांनी घसरला होता. तसेच, ट्रेझरी उत्पन्न एका महिन्यापेक्षा जास्त काळातील सर्वात कमी पातळीवर गेले होते.
दरम्यान, अमेरिकेतील वाढत्या महागाईवर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अंदाजानुसार एप्रिल सीपीआय 3.4 टक्के होता, तर कोर चलनवाढ 3.6 टक्के या तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. यामुळे यूएस फेडनं व्याजदर कपातीची अपेक्षा ठेवली आहे, त्यानंतर शेअर बाजार वधारला, परंतु सेंटीमेंटमध्ये सुधारणा झाल्यामुळे डॉलर निर्देशांक आणि ट्रेझरी उत्पन्न घसरलं. त्यामुळे शेतमाल बाजारातही चांगलीच तेजी दिसून आली.