एक्स्प्लोर

तब्बल 19 हजार रुपयांनी सोनं स्वस्त होणार, खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती 

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सोन्याचे दर कधी कमी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Gold Price :  दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सोन्याचे दर कधी कमी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सध्या भारतात सोन्याच्या किमती 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेल्या होत्या. पण आता त्यात सुमारे 7 ते 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं येत्या 4 ते 6 महिन्यांत सोन्याच्या किमती त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 19000 रुपयांनी कमी होऊ शकतात.

पुढील 4 ते 6 महिन्यांत सोन्याची किंमत 80000 रुपयांपर्यंत येणार

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 6 महिन्यांत सोन्याची किंमत 80000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार ते 85 हजारांच्या दरम्यान दिसते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतू, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पवित्रा थोडा बदलला आणि जागतिक तणाव स्थिर होऊ लागला, त्यामुळे सोन्याच्या किमतीही घसरल्या. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 80000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

किंमती कमी होण्याचं कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत वर्षानुवर्षे वाढ दिसून येत आहे. जानेवारीमध्ये सोन्याने सुमारे 21 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात सुमारे 32 टक्के परतावा दिला आहे. यामागे अनेक कारणे आहेत, जी सोन्याला आधार देत होती. जागतिक तणाव आणि भू-राजकीय घटकांमुळे सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. आता जागतिक तणाव कमी होताना दिसत आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेनमध्ये कायमस्वरूपी युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतींना मिळणारा आधार कमी झाला आहे. यामुळे किंमत कमी होत आहे आणि ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या सोन्याची किंमत किती?

सध्या एमसीएक्सवर सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 92700 रुपये आहे. सोन्याचा भाव 62 रुपयांच्या वाढीसह 92700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. दरम्यान पुढच्या चार ते सहा महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासूनसोन्याचे दर सतत वाढत आहेत. याचा मोठा फटका सोन्याची खरेदी करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळं दर कधी कमी होमार असा प्रश्न विचारला जात होता?

महत्वाच्या बातम्या:

वर्षभरात RBI ने केली 57.5 टन सोन्याची खरेदी, एवढं सोनं खरेदी करण्याचं कारण काय? नेमका किती आहे सोन्याचा साठा?  

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget