सोनं खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, आजचा दर 71000 रुपयांवर
Gold Price News : पुण्यातील सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Gold Price News : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला झळ बसत आहे. मात्र, आज गुढीपाडव्याचा (gudi padwa) सण आहे. आजपासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. दरम्यान, पुण्यातील सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोन्याचा दर 66400 आहे तर वेढणीच्या सोन्याचा दर 71000
पुण्यात गुढी पाडव्याला सराफा बाजारात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. मात्र, नवीन वर्षाची सुरुवात सोन खरेदीने करावी, अशी ग्राहकांची इच्छा आहे. दरम्यान, आज बाजारात सोन्याचा दर हा 66400 आहे तर वेढणीचे दर 71000 आहे. सध्या एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडं बघितलं जातं. त्यामुळं लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे. या काळात मागणीत वाढ झाल्यानं दरातही वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
जळगावात जीएसटीसह सोन्याचा दर 74000 रुपयांवर
साडेतीन मुहूर्तापैकी प्रमुख एक मुहूर्त मानल्या जात असलेला गुढी पाडव्याच्या मुहूर्त जळगावमध्ये सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. यंदा मात्र सोन्याचे दर जीएसटीसह 74000 रुपयांच्या वर जाऊन पोहोचला आहे. सोने खरेदी मुहूर्तालाच सोने व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सोने व्यावसिकांना ग्राहकांची प्रतीक्षा
जागतिक पातळीवर घडत असलेल्या आर्थिक घडामोडीमुळं सोन्याचे दर दिवसागणिक वाढत आहेत. आज हेच सोन्याचे दर 71500 तर जी एस टी सह 74000 रुपये इतक्या उच्च पातळीवर जाऊन पोहोचले असल्याने सर्व सामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अवघड जात आहे. अनेक ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त असला तरी लोक सोने खरेदीसाठी वेट अँड वाच ची भूमिका घेताना दित आहेत. त्यामुळं सोने व्यावसिकांना ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचं पाहायला मिळत आहे. मुहूर्त असल्याने दिवसभरात ग्राहक गर्दी करतील असा विश्वास सोने व्यावसायिकांना आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gudi Padwa Gold price: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 73400, उद्या सकाळपर्यंत सोनं 75 हजाराचा टप्पा गाठणार?