खुशखबर! सोमवारपासून कमी किंमतीत मिळणार सोनं, गुंतवणुकीची मोठी संधी
भारत सरकार तुम्हाला सोमवारपासून सोन्याच्या गुंतवणुकीसाठी खास संधी देणार आहे. बाजारापेक्षा कमी दरात सोन खरेदी करता येणार आहे.
Gold Price : लग्नाच्या मोसमात लोक फक्त दागिने बनवण्यासाठी सोन्याचा (Gold) वापर करत नाहीत, तर गुंतवणुकीसाठी (investment) सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणार असाल तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. भारत सरकार तुम्हाला सोमवारपासून सोन्याच्या गुंतवणुकीसाठी खास संधी देणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रति 10 ग्रॅम सोने 62,000 रुपयांपेक्षा कमी दराने मिळणार आहे.
सोमवारपासून पुन्हा एकदा सॉव्हरेन गोल्ड बाँडची विक्री सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 18 डिसेंबरपासून सार्वभौम गोल्ड बाँड सीरीज-3 ची विक्री सुरु करणार आहे. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूटही मिळणार आहे. अलीकडेच, देशातील बहुतेक सराफा बाजारात सोन्याचा दर 64,000 रुपयांवर गेला आहे, परंतु सोन्याच्या रोख्यांसाठी, आरबीआयने प्रति ग्रॅम 6,199 रुपये दर ठेवला आहे. त्यामुळं सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 62,000 रुपयांच्या खाली आहेत. जर तुम्ही डिजिटल पेमेंट करून सोन्याचे रोखे खरेदी केले तर सोन्याची किंमत 6,149 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयने जारी केलेले सुवर्ण रोखे प्रत्यक्षात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीएवढे आहेत.
गोल्ड बॉण्ड्स खरेदीचा दुहेरी फायदा
सोन्याऐवजी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरते. 8 वर्षांच्या मॅच्युरिटी असलेल्या या बाँड्सवर तुम्हाला प्रचलित सोन्याच्या दरानुसार परतावा मिळतो. याशिवाय सरकारकडून दरवर्षी 2.5 टक्के व्याजही मिळते. एवढेच नाही तर तुम्हाला गोल्ड बाँड्सच्या खरेदीवर जीएसटी भरावा लागणार नाही, तर सोन्याच्या दागिन्यांवर तुम्हाला फ्लॅट 3 टक्के दराने जीएसटी भरावा लागेल.
सोन्याचा दर 70 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
जागतिक पातळीवर सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीमधून ग्राहकांना 22 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांना ही सोने खरेदी परवडली आहे. सोन्याचे दर आगामी काळात तीन चार वर्षात लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाही, पण येत्या मार्च महिन्यापर्यंत मात्र सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पर्यंत जाऊ शकतात.शेअर बाजार वधारला की, सोन्याचे दर घसरत असल्याचं नेहमी पाहायला मिळायचं. मात्र, गेल्या पाच-सहा महिने पासून हा ट्रेंड बदलला आहे. आपल्या देशातील शांततेचं वातावरण आणि चांगली अर्थव्यवस्था हे त्याची कारणं आहेत. त्यामुळे आपल्या देशात गुंतवणूक वाढून सोन्याचे दर आणि शेअर बाजार दोन्ही वधारलं असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत मात्र सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या पर्यंत जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: