एक्स्प्लोर

कोरोना काळात देशातील सोन्याच्या मागणीत घट, एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान आयातीत 40 टक्क्यांची घसरण

Gold Import: कोरोनामुळे देशातील सोन्याच्या आयातीवर परिणाम झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 40 टक्क्यांची घसरण झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान सोन्याची आयात 12.3 अब्ज डॉलर इतकी खाली आली आहे.

नवी दिल्ली: भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातक देश आहे. कोरोनामुळे सोन्याच्या या आयातीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. चालू वित्तीय वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण झाली असून ती 12.3 अब्ज डॉलरवर आली आहे.

सोने आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्याच्या तूटीवर (Current Account Deficit) पडतो. वाणिज्य मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी भारतात 20.6 अब्ज डॉलर इतक्या किंमतीचं सोनं आयात करण्यात आलं होतं. त्यात आता 40 टक्क्यांची घट होऊन ते 12.3 अब्ज डॉलर्सवर आलं आहे.

चांदीच्या आयातीतही एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान 65.7 टक्क्यांची घसरण झाली असून ती 75.2 करोड डॉलर इतकी झाली. सोने-चांदीच्या आयातीतीत घसरणीमुळे देशाची व्यापारी तूट 2020-21 मधील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 42 अब्ज डॉलर इतक्यावर आली आहे. एका वर्षापूर्वी व्यापारी तूट 113.42 अब्ज डॉलर इतकी होती.

नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 8.74 टक्के घट होऊन ती 23.52 अब्ज डॉलरवर पोहोचली. यामध्ये पेट्रोलियम, अभियांत्रिकी, रासायनिक आणि हिरे आणि आभूषणे यांच्या निर्यातीत घट झाली. चालू वर्षातील पहिल्या आठ महिन्यात हिरे आणि आभूषणे उद्योगातील निर्यातीत 44 टक्के घट होऊन ती 14.30 अब्ज डॉलसवर पोहचली आहे. देशातील आयातही 13.32 टक्क्यांनी घसरुन ती 33.39 अब्ज डॉलर इतकी राहिली. यामुळे नोव्हेंबर महिन्यात व्यापारी तूट कमी होऊन ती 9.87 अब्ज डॉलर इतकी झाली.

भारतात वर्षाला 800 ते 900 टन सोन्याची आयात भारत सोन्याचा जगातील सर्वात मोठा आयातक देश आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगांसाठी सोन्याची आयात केली जाते. तसेच भारतात सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. यामुळे दरवर्षी भारतात 800 ते 900 टन सोनं आयात केलं जातं.

संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

Embed widget