एक्स्प्लोर

Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल, आता सहा अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध

What is Hallmark : भारतात 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

Gold Hallmarking Rule Changes from 1 April : केंद्र सरकारकडून सोनं खरेदीच्या (Gold) नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. भारतात 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये (Gold Hallmarking Rule Changes) मोठा बदल करण्यात येणार आहे. यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे. 31 मार्च, 2023 नंतर हॉलमार्क (Hallmark) असलेलं सोनंच वैध मानलं जाईल. हॉलमार्क नसलेलं सोनं (Gold Jewellery without Hallmark) अवैध असेल. त्यामुळे जर तुम्ही 31 मार्चनंतर सोनं खरेदी करणार असाल तर या निर्णयाचा तुमच्यावर परिणाम होणार आहे. 

Gold Hallmarking Rule Change : हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Consumers Affairs Ministry) दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपासून सोनं खरेदी करण्याच्या नियमांमध्ये हा बदल करण्यात येईल. 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होतील. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) चिन्हाशिवाय कोणताही ज्वेलर्स सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Hallmarking Rule Change : 1 एप्रिलपासून हे नवीन नियम लागू

देशात बनावट दागिन्यांची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने (Consumers Affairs Ministry) हॉलमार्कबाबत माहिती देत सांगितलं आहे. चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क गोंधळामुळे मंत्रालयाने हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सहा अंकी हॉलमार्क शिवाय सराफांना सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. तसेच मंत्रालयाने सांगितलं आहे की, आता चार अंकी हॉलमार्क पूर्णपणे बंद करण्यात येतील. बनावट सोन्याची विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरु आहेत.

What is HUID : हॉलमार्क म्हणजे काय?

HUID म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. या क्रमांकावरुन सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता समजते. सोन्याचे दागिने किंवा वस्तूवर हा क्रमांक असतो. या नंबरवरुन सोन्याच्या दागिन्याबाबत संपूर्ण माहिती समजते. याआधी चार अंकी आणि सहा अंकी हॉलमार्क क्रमांक होते. मात्र, आता सरकारने चार अंकी हॉलमार्कवर बंदी घातली असून फक्त सहा अंकी हॉलमार्क वैध ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, 1 एप्रिलपासून हॉलमार्कशिवाय दागिने विकता येणार नाहीत, मात्र ग्राहकांना हॉलमार्कशिवाय जुने सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. देशभरात एकूण 1338 हॉलमार्किंग केंद्रे आहेत. आणखी हॉलमार्किंग केंद्रे उभारली जात आहेत.

हेही वाचा

Gold : सोने विक्रेत्यांनो सावधान...आजपासून विना हॉलमार्क सोनं विक्री केल्यास कारवाई होणार

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget