Gold price today : सोन्याच्या किमतीत किंचीत घसरण, चांदीची खरेदी वाढली, जाणून घ्या आजचे दर
Gold price today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 16 रुपयांनी घट झाली. आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 48 हजार 438 रुपये आहे, तर चांदीच्या दरात 202 रुपयांच्या वाढीसह 62 हजार 569 रुपये आहे.
Gold price today : आज सोन्याच्या (Gold Price Today) दरात थोडी घसरण झाली, तर चांदीच्या (Silver price) किमतीत आज वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. 16 रुपयांच्या घसरणीसह आज सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 48 हजार 438 रुपये आहे, तर चांदीच्या दरात 202 रुपयांच्या वाढीसह प्रति कोलोचा दर 62 हजार 569 रुपये आहे.
काल 8 फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाला त्यावेळी सोने 48 हजार 429 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62 हजार 367 रुपये प्रति किलो होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमती
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मागील सत्रात बुधवारी सोन्याच्या किमती दोन आठवड्यांच्या उच्चांकावर स्थिर होत्या. कारण चलनवाढीचा धोका आणि रशिया-युक्रेन तणावामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने आक्रमक दर वाढीची शक्यता असूनही धातूचे दर कमी केले होते.
देशातील विविध शहरातील दर
नवी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 400 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 590 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 65 हजार 100 रुपये प्रति किलो आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्ही रोजचे सोने आणि चांदीचे दर सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणून घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
- शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्समध्ये 539 अंकाची उसळण
- Indian Post: पोस्ट ऑफीसमध्ये 400 रुपये गुंतवा आणि व्हा एक कोटींचे मालक, जाणून घ्या सविस्तर
- LIC IPO : तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर शेअर्स स्वस्त मिळणार
- National Pension Scheme : रिटायरमेंटच्या आधी भासतेय पैशांची गरज? NPS च्या माध्यमातून होईल चणचण दूर, 'या' अटी कराव्या लागतील पूर्ण