(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनं-चांदी झालं स्वस्त, खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीची (Gold silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात (Gold silver Price) घसरण झाली आहे.
Gold silver Price : सोन्या चांदीची (Gold silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात (Gold silver Price) घसरण झाली आहे. कालच्या दरापेक्षा आज सोनं चांदी स्वस्त झालं आहे. त्यामुळं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र, आज सोन्या चांदीच्या दरात थोडी घसरण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आज सकाळी सकाळी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, सोने चांदी स्वस्त झालं आहे. कालच्या दरापेक्षा आजच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा 60,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 66,470 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्याला नेमका किती दर होता याबाबतची सविस्तर माहिती.
शहर 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली - 60,940 66,470
मुंबई - 60,790 66,320
लखनौ - 60,940 66,470
आग्रा - 60,940 66,470
ग्राहकांना आणखी दरात घट होण्याची अपेक्षा
सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यामुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं अनेक ग्राहकांनी सोन्या चांदीची खरेदी थांबवली होती. सध्या देशात लग्न सराईचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. पण सोन्या चांदीच्या वाढत्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत होता. त्यामुळं खरेदी थांबवली होती. मात्र, आज काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी ग्राहकांसाठी मिळाली आहे. थोडी घसरण पाहायला मिळाली असली तरी पुन्हा दरात यापेक्षा घसरण होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. दर थोडे कमी झाले असले तरी अद्यापही सोने 66 हजार रुपयांच्या पुढेच आहे.
महत्वाच्या बातम्या: