(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अब्जो रुपये बाजार भांडवल असलेल्या गोदरेज उद्योग समुहाची विभागणी, कोणाला कोणती कंपनी मिळणार?
गोदरेज उद्योग समुहाची लवकरच विभागणी होणार आहे. गोदरेज कुटंबात या समुहाच्या कंपन्या विभागल्या जाणार आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Godrej Group Splits: अंगाला लावण्याचा साबणापासून ते थेट बांधकाम क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या गोदरेज उद्योग समुहाचे उद्योग आणि संपत्ती गोदरेज कुटुंबात विभागले जाणार आहेत. म्हणजेच गोदरेज कुटंबात वाटण्या होणार आहेत. तशी अधिकृत माहिती गोदरेज उद्योग समुहाकडून देण्यात आली आहे. 1897 साली अर्देशीर गोदरेज (Ardeshir Godrej) यांनी या उद्योग समुहाची स्थापना केली होती. या समुहाचे आजघडीला बाजार भांडवल 4.1 अब्ज डॉलर्स आहे. गोदरेज कुटुंबात हा उद्योग समूह आता विभागला जाणार आहे. या समुहाच्या कंपन्या आदी गोदरेज (Adi Godrej), नादीर गोदरेज (Nadir Godrej), जमशेद गोदरेज (Jamshyd Godrej) आणि स्मिता गोदरेज (Smitha Godrej) यांच्यात विभागल्या जाणार आहेत.
आदी आणि नादीर गोदरेज यांना मिळू शकतात सूचिबद्ध कंपन्या
सीएनबीसी आवाजच्या रिपोर्टनुसार, आदी गोदरेज आणि नादीर गोदरेज यांना या वाटणीत शेअर बाजारावर सूचिबद्ध असलेल्या कंपन्या मिळण्यांतील बहुसंख्य हिस्सा मिळणार आहे. तर गोदरेज अँड बॉयसे (Godrej & Boyce) ही कंपनी जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज यांना मिळू शकते. या वाटणीची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या वाटणीच्या प्रक्रियेत रॉयल्टी, ब्रँड यूज आणि जमिनीच्या वापराबाबतही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. गोदरेज उद्योग समुहाच्या अनलिस्टेड कंपन्या तसेच लँड बँक डेव्हलपमेंट जमशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. सध्यातरी या उद्योग समुहाने या वाटण्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
जमशेद आणि स्मिता गोदरेज यांना काय भेटणार?
गोदरेज उद्योग समुहाच्या एकूण पाच कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध आहेत. यामध्ये गोदरेज कंझ्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Godrej Consumer Products), गोदरेज प्रॉपर्टीज (Godrej Properties), गोदरेज इंडस्ट्रीज (Godrej Industries), गोदरेज अॅग्रोव्हेट (Godrej Agrovet) आणि अस्टेक लाईफसायन्सेस (Astec Lifesciences) या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या आदी गोदरेज आणि नादीर गोदरेज यांना मिळण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या क्षेत्रांत विस्तारलेला आहे गोदरेज उद्योग समूह?
गोदरेज उद्योग समुहाचा इंजिनिअरिंग, होम अप्लायन्सेस, शेती, सुरक्षा, रियल इस्टेट, कझ्यूमर प्रोडक्ट्स आदी वेगवेगळ्या क्षेत्रांत विस्तार झालेला आहे. 1897 साली स्थापन झालेल्या गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड या समुहाकडे गोदरेज अॅग्रोव्हेट कंपनीची 64.89 टक्के, गोदरेज कंझ्यूमर प्रोडक्ट्समध्ये 23.74 टक्के, गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये 47.34 टक्के मालकी आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडर स्वस्त; बँकेच्या नियमांतही बदल
करप्रणालीत बदल कसा करावा? नव्या वर्षात हे शक्य आहे का? जाणून घ्या सविस्तर
तुमच्या पीएफ खात्यात अजूनही व्याज जमा झालं नाही? कसं तपासायचं? जाणून घ्या सोप्या स्टेप्स!