एक्स्प्लोर

इकडे काडीमोड, तिकडे रेमंडचे अडीच हजार कोटी बुडाले; पत्नीच्या आरोपांनंतर सिंघानियांचं साम्राज्य अडचणीत

13 नोव्हेंबरपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण (Raymond Share Fall) नोंदवली जात आहे. आज सलग बाराव्या दिवशी रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण सुरुच असल्याचं पाहायला मिळालं.

Raymond Lost 25000 Crore Rupees: रेमंड (Raymond) समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांच्या पत्नी नवाज मोदी (Nawaz Modi) यांच्यातील घटस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील घटस्फोटामुळे गौतम सिंघानिया यांच्या बिझनेसमधील अडचणी सातत्यानं वाढताना दिसत आहेत. रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या विभक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर शेअर्समध्ये सातत्यानं घसरण सुरुच आहे.  

13 नोव्हेंबरपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण (Raymond Share Fall) नोंदवली जात आहे. आज सलग बाराव्या दिवशी रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण सुरुच असल्याचं पाहायला मिळालं.  मागील 12 दिवसांत जवळपास 20 टक्क्यांनी शेअरमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल अडीच हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचं दिसून येत आहे. 

मागील एका आठवड्यात रेमंडचा शेअर 13 टक्क्यांनी घसरला होता. एका आठवड्याआधी 1 हजार 753 वर असलेला शेअर 1 हजार 520 पर्यंत आज खाली आला आहे. शेअर मार्केटमध्ये सातत्यानं होणाऱ्या पडझडीनंतर रेमंड ग्रुपकडून गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या पत्नींनी त्यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. तसेच, नवाज मोदी यांच्याकडून 75 टक्के वाटा मागण्यात आला आहे, तेव्हापासूनच रेमंडच्या शेअर्समध्ये पडझडीचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.  

Raymond च्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता

एका बोर्ड सदस्याकडून दुसऱ्यावर इतके गंभीर आणि घृणास्पद आरोप होत असतानाही तुम्ही गप्प आहात, असा सवाल सल्लागार संस्थेनं संचालकांना केला आहे. या प्रकरणामुळे रेमंडचे गुंतवणूकदार  (Raymond Investors) चिंतेत आहेत, जे गेल्या काही दिवसांत शेअरच्या किमतींत झालेली लक्षणीय घट पाहता स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच, तुम्ही बाळगलेल्या मौनाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, असं फर्मनं गौतम सिंघानियांना सांगितलं आहे. दरम्यान, नवाज मोदींच्या कंपनीचा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या गौतम सिंघानिया यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची सूचनाही आयआयएएसनं केली आहे.

पत्नीनं मागितलाय 75 टक्के वाटा 

नवाज मोदींनी गौतम सिंघानियापासून विभक्त होण्यासाठी संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला आहे. सिंघानिया ट्रस्ट स्थापन करून ही रक्कम देण्यास तयार होते. पण, त्यांच्या पत्नी नवाज यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण, ट्रस्त स्थापन झाल्यानंतर त्यातील रकमेवर पूर्णपणे गौतम यांचाच अधिकार राहिला असता. गौतम यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पश्चात ही रक्कम नवाजकडे गेली असती, त्यामुळे नवाज यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. 

(Disclaimer : या बातमीद्वारे शेअर्स विक्री अथवा खरेदीचा दिला जात नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. कोणत्याही अभ्यासाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करू नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांशी चर्चा करा.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोडले सारे विक्रम! Tata Tech ची धमाकेदार लिस्टिंग; IPO घेणाऱ्या गुंतवणूकदारांची पहिल्याच दिवशी चांदी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget