गौतम अदानी यांच्या मुलाने आखला 20 हजार कोटींचा प्लॅन, कुठे करणार एवढा खर्च?
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे पुत्र करण अदानी (Karan Adani) यांनी बंदर व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या काही दिवसांत करण अदानी 20 हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत.
Karan Adani : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे पुत्र करण अदानी (Karan Adani) यांनी बंदर व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते सर्व रखडलेले प्रकल्प सुरु करण्यात व्यस्त आहेत. येत्या काही दिवसांत करण अदानी 20 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी याने 20 हजार कोटी रुपयांची योजना बनवली आहे. अदानी पोर्ट आणि एसईझेड कंपनीचे व्यवस्थापन करणारे करण अदानी हे पैसे केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर खर्च करणार आहेत. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. विझिंजम येथील बंदर हे भारतीय उत्पादकांसाठी मोठा बदल घडवून आणेल. यामुळं त्यांच्या लॉजिस्टिक खर्चात 30 ते 40 टक्के घट होईल. APSEZ ने PPP मॉडेल अंतर्गत अंदाजे 8,867 कोटी रुपये खर्चून बंदर विकसित केले आहे.
20 हजार कोटी रुपये खर्च करणार
आम्ही आणखी 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. उर्वरित टप्पे आम्ही एकाच वेळी पूर्ण करू शकतो असे करण अदानी म्हणाले. कंपनी उत्पादकांसाठी लॉजिस्टिक खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. अदानी म्हणाले की, बंदर प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतू सामान्य जनता, सरकार आणि राजकीय पक्षांच्या पाठिंब्यामुळे पहिला टप्पा पूर्ण होण्यास मदत झाली. आम्ही आमचे विचार मांडले आहेत. स्थानिक लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. इतर सर्व राजकीय पक्षांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. केरळमध्येच नाही तर देशाच्या कोणत्याही भागात कोणताही प्रकल्प करणं सोपे नाही. पण आता या मिशनमध्ये सर्वजण आम्हाला साथ देत असल्याचे करण अदानी म्हणाले.
देशातील पहिले आंतर-वाहतूक बंदर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका
सुरुवातीला त्यांना ब्रेकवॉटर बांधण्यासाठी आवश्यक प्रमाणात दगड मिळण्यात अडचणी आल्या. आमच्याकडे आता बाकीचे टप्पे पूर्ण करण्यासाठी पुरेसा दगड आहे. ब्रेकवॉटर जवळजवळ पूर्ण झाले आहे. विझिंजम बंदर त्याच्या विशेष स्थानामुळे देशातील पहिले आंतर-वाहतूक बंदर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत येथील बंदरावर आयोजित समारंभात 300 मीटर लांबीच्या 'सॅन फर्नांडो'चे औपचारिक स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या: