एकाच वेळी 'या' कंपनीनं 700 कामगारांनी दिला नारळ, नेमकी का केली नोकरकपात?
job cuts News : अमेरिकेच्या एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना धक्कातंत्र दिलं आहे. कंपनीनं 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
job cuts News : अमेरिकेच्या एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना धक्कातंत्र दिलं आहे. कंपनीनं 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट (Fidelity Investments) असं या कंपनीचं नाव आहे. 2017 नंतर प्रथमच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी पाऊल उचललं आहे. 700 कर्मचारी म्हणजे कंपनीच्या केवळ 1 टक्के कर्मचाऱ्यांना या पायरीचा फटका बसला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कंपनीत सुमारे 74 हजार कर्मचारी कार्यरत होते.
फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सचे प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय खूप कठीण होता. परंतू, आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हे करणे खूप महत्वाचे होते. वाढीच्या काळातही, आमचा व्यवसाय पुढील वर्षांमध्ये स्पर्धात्मक राहील याची आम्ही खात्री करत असल्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये केवळ नोकरकपातच झाली नाही तर अलीकडे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातही मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबीगेल जॉन्सन यांनी मॅगी सेरावल्ली यांची नवीन मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर केविन बॅरी यांना पदोन्नती देऊन वित्त प्रमुख करण्यात आले आहे. हा बदल कंपनीच्या मोठ्या धोरणाचा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! TCS मध्ये नोकरकपात होणार नाही, लवकरच आणखी भरती होणार