संयुक्त किसान मोर्चाकडून आज भारत बंदची हाक, व्यापारी वर्गानं घेतला मोठा निर्णय
शेतमालाला एमएसपीसह (MSP) इतर अनेक मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं (Samyukt Kisan Morcha) आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय.
Farmer Protest: शेतमालाला एमएसपीसह (MSP) इतर अनेक मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं (Samyukt Kisan Morcha) आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत ग्रामीण भारत बंद पाळण्यात येणार आहे. या संपाला 'ग्रामीण भारत बंद' असे नाव देण्यात आलं आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. मात्र, व्यापारी वर्गाने या घोषणेला विरोध करत भारत बंदच्या दिवशी देशभरातील दुकाने उघडण्याचे आदेश जारी केले आहेत.
आज शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला असून, त्यात व्यापारी वर्ग सहभागी होणार नाही आणि देशभरातील सर्व बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने याबाबतची माहिती दिली आहे. व्यापारी भारत बंद दरम्यान त्यांची दुकाने उघडी ठेवतील, जतसेच जनतेला आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता करुन देतील असे मत CAT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी व्यक्त केलंय. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवून देशाच्या अर्थव्यवस्थेत व्यापारी महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली असली तरी आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आमची दुकाने उघडी ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदमुळं देशाचं झालं होतं 25 ते 30 हजार कोटींचं नुकसान
CAT ने देशभरातील व्यापाऱ्यांना भारत बंद दरम्यान त्यांच्या आस्थापना आणि ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे. संस्थेच्या सदस्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही व्यत्यय टाळता येईल.
CII च्या अहवालानुसार, 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा देशाचे 25 ते 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हा आकडा 2020 चा आहे. सध्या 2024 चालू आहे. तज्ज्ञांच्या मते हा आकडा 40 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. CII अहवालात असे म्हटले आहे की भारत बंदमुळे झालेले नुकसान भरून काढता येत नाही. कारण ते देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागतो.
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार, कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी संघटनांशी चर्चेचं आवाहन केलं. यासोबतच शेतकरी संघटनांनी सर्व बाबींची काळजी घेऊन असामान्य परिस्थिती निर्माण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. जनजीवन विस्कळीत होऊ नये याची काळजी या संघटनांनी घ्यायला हवी असंही मुंडा म्हणाले. सर्वसामान्यांसाठी अडचणी निर्माण केल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे शेतकरी संघटनांनी संवादाचे वातावरण ठेवावे आणि संवादातूनच तोडगा काढावा असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: