Meta : फेसबुकची मूळ कंपनी मेटा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत, झुकेरबर्ग कंपनीचा दावा
रॉयटर्सच्या अहवालानुसार, मेटा शेअरहोल्डर अल्टिमीटर कॅपिटल मॅनेजमेंटने संस्थापक झुकरबर्ग यांना एक खुले पत्र लिहून कंपनीला नोकऱ्या आणि भांडवली खर्चात कपात करण्याची मागणी केली आहे.
Facebook : जगभरात मंदीचे ढग दाटू लागले आहेत. शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केलीये. एका रिपोर्टनुसार मार्क झुकेरबर्गच्या (Mark Zuckerberg) कंपनीचा दावा आहे की, या आठवड्यापासून तेथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाईल. याआधी इलॉन मस्क यांनींही ट्विटर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याची घोषणा केली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, मेटा शेअरहोल्डर अल्टिमीटर कॅपिटल मॅनेजमेंटने संस्थापक झुकरबर्ग यांना एक खुले पत्र लिहून कंपनीला नोकऱ्या आणि भांडवली खर्चात कपात करण्याची मागणी केली आहे. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने हजार कर्मचार्यांना कामावरून काढलंय. तर रॉयल फिलिप्स एनव्हीने चार हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. आता मेटा-मालकीचे फेसबुकदेखील या यादीत समाविष्ट होऊ शकतं. त्यामुळे मंदीच्या भीतीचे आता वास्तवात रुपांतर होताना दिसतंय
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार. मेटा शेअरहोल्डर Altimeter कॅपिटल मॅनेजमेंटने संस्थापक झुकरबर्ग यांना एक खुले पत्र लिहून कंपनीने नोकऱ्या आणि भांडवली खर्चात कपात करण्याची मागणी केली आहे. Altimeter कंपनीने किमान 20 टक्के कर्मचार्यांना काढण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच भांडवली खर्च किमान 5 अब्ज डॉलर ते 25 अब्ज डॉलर प्रतिवर्ष कमी करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
मेटाने खर्च वाढवल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. Meta ने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत आणि Metaverse साठी जगभरात हजारो कर्मचारी नियुक्त केले आहेत. एवढी मोठी गुंतवणूक धोकादायक असल्याचे अल्टिमीटरने म्हटले आहे. एका रिपोर्टनुसाक कर्मचारी कपात करण्याचा हा निर्णय Meta च्या इतिहासात पहिल्यांदा घेण्यात आला आहे. सप्टेंबर 2022 च्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार मेटामध्ये जवळपास 87000 नागरिक काम करत आहेत. तज्ज्ञांच्या मते मेटा कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे मेटाच्या स्टॉकमध्ये यावर्षी मोठी घट झाली आहे. कंपनीचे शेअर 73 टक्क्यांनी खाली आले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेणयात आलेला आहे.
ट्विटरमध्ये देखील कर्मचारी कपात
ट्विटरमध्ये कर्मचारी कपात सुरु होणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. कपातीसंदर्भात कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आलीय... कंपनीच्या हिताकरता हे दुर्दैवी पाऊल उचलावे लागत असल्याचं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय. ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या साडे सात हजारांहून अधिक असून पहिल्या टप्प्यात दोन हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. ट्विटर कर्मचाऱ्यांसाठी असलेले वर्क फ्रॉम एनिवेअर पॉलिसीतही बदल केले जाणार असल्याचं समजतंय. कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येत काम करण्याच्या सूचना मिळण्याचीही शक्यता आहे.