EPFO खात्यातून किती रक्कम काढल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही, जाणून घ्या महत्त्वाचा नियम
EPFO News : एमप्लॉईज प्रोविडंट फंडस् संघटना म्हणजेच ईपीएफओमध्ये खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम जमा केली जाते.
नवी दिल्ली : भारतात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पीएफ खाती उघडली जातात. भारतातील पीएफ खाती एम्पलॉई प्रॉविडंट फंड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओकडून संचलित केली जातात. या खात्यांना एका प्रकारे बचत योजना म्हणून देखील पाहिलं जातं.कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 12 टक्के रक्कम कपात करुन ईपीएफ खात्यात जमा केला जाते. तितकी रक्कम कंपनीकडून देखील पीएफ खात्यात जमा केली जाते.
पीएफ खात्यातील रक्कम तुम्ही आर्थिक गरज असल्यास काढू शकता. जेव्हा तुम्ही इपीएफओमध्ये 10 वर्ष रक्कम जमा करता तेव्हा तुम्ही पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरता. मात्र, एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढली तर तुम्हाला पेन्शन मिळत नाही. इपीएफओचा पेन्शन संदर्भातील नेमका नियम काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे.
पीएफ खात्यात कर्मचाऱ्याच्या पगारातून 12 टक्के रक्कम जमा केली जाते. तर, तितकीच रक्कम कंपनीकडून देखील जमा केली जाते. कंपनीकडून 12 टक्के रक्कम जमा केली जाते त्यापैकी 8.33 टक्के रक्कम खातेधारकाच्या पेन्शन फंडमध्ये जाते. तर, 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते. कोणताही पीएफ खातेधारक 10 वर्ष पीएफ खात्यात योगदान देत असेल तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो.
एखाद्या कर्मचाऱ्यानं काम सोडलं आणि कोणत्याही कारणासाठी पीएफ खात्यातील सर्व रक्कम काढल्यास त्याचा ईपीएस किंवा पेन्शन फंड तसाच असतो. अशा स्थितीत त्यांना पेन्शन मिळते. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्यानं पीएफ खात्यासह ईपीएसमधील सर्व रक्कम काढल्यास त्याला पेन्शन मिळत नाही.
ईपीएफोच्या नियमानुसार कोणताही कर्मचारी 10 वर्ष पीएफ खात्यात पैसे जमा करत असेल तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. वयाच्या 50 वर्षानंतर तो पेन्शनसाठी दावा करु शकतो.
ईपीएफओ खात्यातील शिल्लक कशी पाहायची?
कर्मचारी ईपीएफओ खात्यातील रक्कम पाहण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करु शकतात. ईपीएफओच्या पासबूकच्या वेबसाईटला भेट देऊन शिल्लक पाहता येईल. यासाठी पासबूकच्या वेबसाईटवर लॉगिन करुन कोणत्या कंपनीत काम केलं असेल तिथल्या पासबुक क्रमांकाचा वापर करुन पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतो. याशिवाय 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन देखील तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. त्यासाठी त्यासाठी तुमच्या बँक खाते, आधार क्रमांक आणि पॅन खात्याची माहिती पीएफ खात्यात नोंदवेलली असणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :