एक्स्प्लोर

क्लेम सेटलमेंटबाबत EPFO चा नवा नियम, 'या' निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार!

ईपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला पीएफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी येतात. आधार कार्डवरील माहिती चुकीची असेल तर ही डोकेदुखी चांगलीच वाढते.

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) क्लेम सेटलमेंटच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. मृत्यू झालेल्या अनेक खातेधारकांचे आधार पीएफ खात्याशी लिंक नसते किंवा  आधार कार्ड आणि पीएफ खात्यावर त्यांची माहिती जुळत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यावर करावयाच्या प्रक्रियेत ईपीएफओने बदल केला आहे. या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकाच्या कुटुंबीयांची डोकेदुखी कमी होणार आहे. 

कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी

आता पीएफ खातेधारकाचे नॉमिनी खातेधारकाच्या आधार डिटेल्सशिवायदेखील पीएफची रक्कम मिळवू शकतात. ईपीएफओने नुकतेच एक सर्क्यूलर जारी केले होते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांना मृत खातेधारकाच्या माहितीची त्याच्या आधार कार्डशी जुळवाजुळव करताना, पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा स्थितीत मृत खातेधारकाच्या कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी येतात.  

आता प्रांत अधिकारी देणार मंजुरी 

ही अडचण येऊ नये म्हणून ईपीएफओने आता नवा नियम केला आहे. कारण पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे आधार आणि पीएफ खाते लिंक न करताच भौतिक आधारावर पडताळणी करून अशी प्रकरणं निकाली काढण्यात येतील. प्रांत अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच अशा प्रकरणांत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळेल. फसवणूक होऊ नये म्हणून प्रांत अधिकाऱ्यांकडून पीएफ खातेधारकाच्या नॉमिनीची पडताळणी केली जाईल.  

नवा नियम कोठे लागू होणार 

ज्या पीएफ खातेधारकाची माहिती ईपीएफ यूएएनवर बरोबर आहे मात्र ही माहिती आधार कार्डशी जुळत नसेल तर अशा स्थितीत हा नवा नियम लागू होईल. एखाद्या खातेधारकाची माहिती आधार कार्डवर बरोबर आहे पण ही माहिती यूएएनवर चुकीची असेल तर त्यासाठी नवी प्रक्रिया आणि वेगळा नियम आहे. 

दरम्यान आधार डिटेल्स न नोंदवताच एखाद्या ईपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत नॉमिनी असलेल्या व्यक्तीच्या आधारवरील माहिती सिस्टिममध्ये अपडेट केली जाईल तसेच नॉमिनीला सही करण्याची परवानगी दिली जाईल. एखाद्या मृत ईपीएफ खातेधारकाचे नॉमिनी नसतील तर अशा स्थितीत कायद्याच्या दृष्टीने जो उत्तराधिकारी ठरेल त्याचे आधार जमा करण्यास ईपीएफओकडून परवानगी दिली जाईल.

हेही वाचा : 

मृत्यूनंतर व्यक्तीच्या आधार कार्डचे काय करावे? ते सरकारला परत करता येते का? वाचा नेमकं काय करावं?

मोदी सत्तेत आल्यास 'हे' शेअर्स बनणार रॉकेट, देणार दमदार रिटर्न्स? निवडणुकीच्या निकालानंतर नेमकं काय होणार?

क्रेडिट कार्डवरील 16 अंकी क्रमांकाचा नेमका अर्थ काय? सीव्हीव्ही नंबर काय? जाणून घ्या

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
RBI चा खासगी बँकेला दणका, 59.20 लाख रुपयांचा दंड, आरबीआयची कारवाई कोणत्या कारणामुळं?
Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget