कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये यावच लागेल, TCS चा मोठा निर्णय; TCS मध्ये नोकरकपात होणार का?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीचे जे कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करत होते, त्यांना आता ऑफिसला यावं लागणार आहे.
TCS News : देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी असणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीचे जे कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करत होते, त्यांना आता ऑफिसला यावं लागणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे घरुन काम बंद केले आहे. कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम सुविधेचा सर्वाधिक फायदा आयटी उद्योगाला झाला. ज्याचा कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला नाही. आता हेच काम घरबसल्या कंपन्यांना त्रास देऊ लागले आहे.
TCS कडून नोकरकपातीच्या वृत्ताचे खंडन
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात यावं लागणार आहे. त्यामुळं घरुन कर्मचाऱ्यांना आता घरुन काम करता येणार नाही. दरम्यान, यासोबतच टीसीएसने नोकरकपातीच्या वृत्ताचे खंडन केलं आहे. TCS मध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, याबाबतचे वृत्त TCS ने फेटाळले आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊनच काम केले पाहिजे, कारण घरुन काम करणं हा कर्मचारी आणि कंपनी दोघांच्याही प्रगतीचा योग्य मार्ग नाही. याआधीही टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे. कर्मचारी संख्या, उत्पन्न आणि नफा या बाबतीत TCS ही भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी आहे. दरम्यान, जगातील अनेक देशात सध्या आर्थिक मंदी सुरु आहे. मंदीच्या गर्तीत सापडलेल्या देशांमध्ये नोकरकपात केली जात आहे. त्याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. मात्र, भारताचा आर्थिक विकास योग्य दिशेनं होत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात येत आहे.
आयटी क्षेत्रात नोकऱ्या वाढण्याची शक्यता
दरम्यान, NASSCOM (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज), आयटी कंपन्यांची संघटनेनं आयटी क्षेत्राबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात उद्योगानं केवळ 60,000 नोकऱ्या दिल्या. त्यामुळं कर्मचाऱ्यांची संख्या 54.3 लाख झाली आहे. तर टीसीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं आम्हाला अधिक कामासाठी अधिक लोकांची गरज आहे. खरे तर नोकरभरती कमी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही जशाच प्रकारे कर्मचाऱ्यांना कामावर ठेवत आहोत. आम्हाला फक्त नियुक्तीची प्रक्रिया बदलावी लागेल. टीसीएसमध्ये सध्या सहा लाखांहून अधिक लोक कार्यरत आहेत.
महत्वाच्या बातम्या: