Maharashtra Weather Update: कोकण किनारपट्टीसह पुणे, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा; IMD ने पुढील 2 दिवस दिले हायअलर्ट, वाचा सविस्तर अंदाज
Rain Update: सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे .

Maharashtra Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणाऱ्या असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज मुंबई पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा- विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे .मराठवाड्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे . (Rain Update)
हवामान खात्याचा अंदाज काय ?
महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे .पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .आज संपूर्ण कोकणात विविध अलर्ट देण्यात आले आहेत .मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे .
मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता असून अहिल्यानगर पुण्यातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
5 सप्टेंबर : रायगड ठाणे पालघर नंदुरबार नाशिक व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट .मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट .नाशिक धुळे जळगाव बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
6 सप्टेंबर : पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट . रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा नाशिक घाटमाथा तसेच पालघर नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट .उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरणार .
7 सप्टेंबर : नाशिक व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट .रायगड रत्नागिरी जिल्ह्यालाही पाऊस झोडपणार.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
मागील 24 तासात म्हणजेच बुधवारी सकाळपर्यंत कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला .राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली .मराठवाडा आणि विदर्भात काल सकाळपासून ढगाळ वातावरण आहे .अनेक भागात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे .त्यात हलक्या सरींनीही हजेरी लावली . सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे .मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितलं .
राज्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा
गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत .राज्यभरातील मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता 93.12 टक्क्यांवर गेला आहे .मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु धरणांमधील जलसाठा 57.18 टक्क्यांवर गेला आहे .मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठी धरण भरत आली आहेत .छत्रपती संभाजीनगर मध्ये 81.10% पाणीसाठा आहे .
























