'गर्मी में ठंड का एहसास' टॅगलाईन असणारी 'डर्मीकूल' कंपनीची 432 कोटींना विक्री, जाणून घ्या कारण
जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या 'डर्मीकूल' ही कंपनी इमामी लिमिटेडने खरेदी केली आहे.
Dermicool Company : उन्हाळ्यात घाम येणे आणि घामोळ्यांची समस्या कमी करण्यासाठी टाल्कम पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उन्हाळ्यातील पावडरसाठी 'डर्मीकूल' हा ब्रँड लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय उत्पादन आहे. जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या 'डर्मीकूल' ही कंपनी इमामी लिमिटेडने खरेदी केली आहे. कंपनीने कालच याबाबची घोषणा केली.
फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी (FMCG) इमामीने रेकिटसोबत 432 कोटी रुपयांचा हा करार केला आहे. या करारानंतर, इमामीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, डर्मिकूल ब्रँडच्या अधिग्रहणाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे उत्पादन सध्या आमच्याकडे असलेल्या व्यवसायात पूर्णपणे बसते.
'डर्मीकूल' खरेदीवर इमामीचं स्पष्टीकरण
'डर्मीकूल'च्या समावेशामुळे इमामीची बाजारपेठेतील स्थिती आणखी मजबूत होईल. उन्हाळ्यातील वाढतं तापमान पाहता आम्ही आमच्या उत्पादनाद्वारे लोकांना दिलासा देण्यास तयार आहोत असं इमामीचे संचालक हर्षा व्ही अग्रवाल यांनी सांगितलं आहे. 'डर्मीकूल' व्यतिरिक्त, झंडू, केश किंग आणि जर्मन ब्रँड क्रीम 21 हे काही ब्रँड किंवा व्यवसाय आहेत जे कंपनीने गेल्या काही वर्षांत विकत घेतले आहेत. 'डर्मीकूल'ची पावडर उन्हाळ्याच्या ऋतूतील उष्णतेपासून थंडपणा आणि आराम देण्यासाठी लोकप्रिय आहे. त्यांच्या मार्केटिंगमध्ये प्रत्येक विभागाशी चांगला समन्वय असल्याने ही पावडर मध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीय लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. 'आया मौसम थंडे थंडे डरमीकूल का' ही त्यांची जिंगल लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे काम करते आहे.
- New IPO : कृष्णा डिफेन्सचा आयपीओ लवकरच; तारीख, लॉट आणि किंमत जाणून घ्या सविस्तर
- LIC IPO : एलआयसी विमाधारकांनो, LIC IPO अर्ज करण्याआधी 'या' कामासाठी आजचा शेवटचा दिवस
- ..म्हणून शेअर बाजारात सातत्याने पडझड? विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 35 हजार कोटी काढले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha