एक्स्प्लोर

Elon Musk : ईलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, 'या' कंपनीला मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

Starlink in India : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईलॉन मस्कच्या स्टारलिंक कंपनीला कंपनीला लवकरच सरकारकडून परवाना मिळणार आहे. यामुळे दुर्गम भागात जलद इंटरनेट वापरणे सोपे होणार आहे.

Starlink in India : टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ईलॉन मस्कच्या (Elon Musk) आणखी एका कंपनीची लवकरच भारतात एन्ट्री होणार आहेत. ही एंट्री टेस्लामार्फत नसून सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या (Starlink) माध्यमातून होणार आहे. स्टारलिंकला लवकरच नियामक मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. याबाबतचा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परवाना मिळताच कंपनी भारतात काम सुरू करेल. स्टारलिंकच्या आगमनाने दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीची स्थिती सुधारू शकते.

शेअर होल्डिंग पॅटर्नची माहिती देणार (Starlink in India News) 

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, ईलॉन मस्कची स्टारलिंक आपल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागासमोर देणार आहे. यानंतर त्याच्या कंपनीला दूरसंचार विभागाकडून (DoT) ऑपरेटिंग प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर दूरसंचार विभागाकडून दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले जाईल. मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स विंगद्वारे स्टारलिंकला एक मान्यता पत्र जारी केलं जाईल.

वनवेब आणि रिलायन्स जिओला आधीच परवाना (OneWeb) 

स्टारलिंकने 2022 मध्ये सॅटेलाइट सर्व्हिसेस (GMPCS) द्वारे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन्ससाठी अर्ज केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर हा परवाना मिळवणारी ती तिसरी कंपनी ठरेल.

स्टारलिंकचा वेग किती असेल? (Internet Speed Of Starlink) 

स्टारलिंक त्याच्या ग्राहकांना 25 ते 220 Mbps पर्यंत डाउनलोड गती प्रदान करते. त्यांचा अपलोड स्पीड सुमारे 5 ते 20 एमबीपीएस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्टारलिंक वेबसाइटचा दावा आहे की बहुतेक ग्राहक 100 Mbps पेक्षा जास्त डाउनलोड स्पीडचा आनंद घेत आहेत. सध्या भारतातील दुर्गम भागात टॉवर्सच्या ऑप्टिकल फायबरद्वारे एवढा वेग मिळणे अवघड आहे. स्टारलिंक उपग्रहाद्वारे इंटरनेट पुरवत असल्याने ते 5G ऐवजी 4G गती प्रदान करण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे.

सेवेची किंमत इतकी असू शकते

स्टारलिंकने सध्या भारतासाठी दर निश्चित केलेले नाहीत. पण हाती आलेल्या एका अहवालानुसार, त्याची किंमत पहिल्या वर्षी सुमारे 1.58 लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी 1.15 लाख रुपये असू शकते. त्यावर 30 टक्के करही भरावा लागणार आहे. यामध्ये उपकरणाची किंमत 37,400 रुपये असून दरमहा 7,425 रुपये आकारले जाऊ शकतात.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget