जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलन मस्क तिसऱ्या स्थानी, अब्जावधी डॉलर्सचं नुकसान, 2024 मध्ये का बसतोय फटका?
एलन मस्क यांच्या उद्योग व्यवसायासाठी 2024 हे वर्ष फार चांगले जात नसल्याचे दिसत आहे. कारण, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Elon Musk Wealth: एलन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत. मात्र, सध्याचा काळा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. एलन मस्क यांच्या उद्योग व्यवसायासाठी 2024 हे वर्ष फार चांगले जात नसल्याचे दिसत आहे. कारण, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या वर्षाचा तिसरा महिना अद्याप अर्धाही संपलेला नाही, तोपर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत अब्जावधी डॉलरची घट झाली आहे.
2024 मध्ये आतापर्यंत किती नुकसान?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती आता 189 अब्ज डॉलर इतकी खाली आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची एकूण संपत्ती तब्बल 40.4 अब्ज डॉलरने घसरली आहे. या नुकसानीमुळं ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही राहिले नाहीत. ब्लूमबर्गच्या मते, एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. आठवड्याभरापूर्वी एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, सध्या त्यांच्या संपत्तीत अब्जावधी डॉलरची घट होत असल्याचं चित्र दिसत आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीत एलन मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची सध्याची संपत्ती 195.1 अब्ज डॉलर आहे. एलन मस्कच्या नेट वर्थमधील या मोठ्या घसरणीमागे टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण?
एलन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीचा सर्वात मोठा भाग त्याच्या टेस्लामधील स्टेकमधून येतो. एलन मस्ककडे सध्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीत सुमारे 21 टक्के हिस्सा आहे. टेस्ला शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. एकट्या यावर्षी, टेस्लाचे शेअर्स आतापर्यंत 29 टक्क्यांनी घसरले आहेत, तर 2021 मध्ये गाठलेल्या उच्च पातळीच्या तुलनेत, टेस्लाच्या शेअर्सच्या किमती जवळपास निम्म्या झाल्या आहेत.
जगात सर्वात श्रीमंत कोण?
ब्लूमबर्ग आणि फोर्ब्स या दोन्हींच्या यादीत फ्रान्सचा बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्गच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती 201 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत Amazon चे जेफ बेजोस 198 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर फोर्ब्सच्या यादीत अरनॉल्ट आणि कुटुंबाची एकूण संपत्ती 232.8 अब्ज डॉलर्स आहे. तर जेफ बेजोस 194 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! ना मस्क, ना बेजोस 'हा' आहे जगातील श्रीमंत व्यक्ती, संपत्ती एकूण व्हाल थक्क