Donald Trump : चीनमध्ये कंपन्यांची उभारणी,भारतीयांना नोकरी देणं महागात पडेल, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन टेक कंपन्यांना देशभक्तीचा मंत्र देत इशारा
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकन कंपन्यांनी चीनमधील कारखाना उभारणी आणि भारतातून नोकरभरती करणं थांबवा असा इशारा दिला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक कंपन्यांना इशारा दिला आहे. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरु करणे आणि भारतातून कर्मचाऱ्यांची भरती करण्याबद्दल थेट इशारा दिला आहे. अमेरिकेचं नेतृत्व त्यांच्याकडे असताना गोष्टी होऊ देणार नाही, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी AI समिटमध्ये म्हटलं की अमेरिकन टेक कंपन्यांनी रॅडिकल जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारला. यामुळं कोट्यवधी अमेरिकन नागरिकांशी धोका झाला आणि विश्वासघात झाला. ते म्हणाल गेल्या दीर्घ काळापासून अमेरिकन तंत्रज्ञान उद्योगानं असे मार्ग स्वीकराले ज्यामुळं देशातील लोकांची फसवणूक झाल्याचं वाटत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या टेक कंपन्यांवर टीका केली आहे. या लोकांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला मात्र कारखाने चीनमध्ये उघडले, कामगार भारतातून घेतले. फायदा आयर्लंड सारख्या देशात कमी कर देऊन फायदा मिळवला. या कंपन्यांनी अमेरिकेच्या लोकांना दुर्लक्षित केलं. अमेरिकेच्या लोकांचा आवाज देखील दाबण्यात आला, ट्रम्प यांच्या कार्यकाळात असं होऊ देणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एआयच्या शर्यतीत अमेरिकेला विजय मिळवून देण्यासाठी टेक कंपन्यांनी देशहिताला प्राथमिकता द्यावी. ट्रम्प म्हणाले एआयच्या शर्यतीत विजय मिळवण्यासाठी आम्हाला टेक्नोलॉजी इंडस्ट्रीमध्ये एक नवी देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा आवश्यक आहे जी सिलिकॉन व्हॅलीत असावी, असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की अमेरिकेच्या टेक कंपन्यांन पूर्णपणे अमेरिकेसाठी काम करावं. फक्त तुम्ही अमेरिका प्रथम धोरण राबवा, असंही त्यांनी म्हटलं.
एआय समिटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन आदेशांवर सही केली. ज्याचा हेतू अमेरिकेत एआय इंडस्ट्रीला मजबुती देणे, व्हाइट हाऊस अॅक्शन प्लॅन आणि अमेरिकेच्या एआय टेक्नोलॉजीला जागतिक स्तरावर प्रमोट करण्याबाबत राष्ट्रीय धोरणाचा समावेश आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात कराराबाबत चर्चा सुरु
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आक्रमक धोरण राबवलं आहे. अमेरिका प्रथम हे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवलं आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लदण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी परस्परशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्टपासून परस्परशुल्क लादणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहेत. त्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या नाहीत. भारतानं कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करावं, अशी अमेरिकेची मागणी आहे. त्याला भारताचा नकार आहे.
























