एक्स्प्लोर

India UK FTA : भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी, नरेंद्र मोदी आणि कीर स्टारमर यांची घोषणा 

भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी, नरेंद्र मोदी आणि कीर स्टारमर यांची घोषणा, 'या'क्षेत्रांना फायदा 

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार सहमती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. लंडन येथील चेकर्स येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. यूकेच्या पंतप्रधानांचं ते ग्रामीण भागातील अधिकृत निवासस्थान आहे. 

 मुक्त व्यापार करारामुळं भारत आणि ब्रिटन यांच्यात आर्थिक विकासाच्या आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. प्रामुख्यानं या कराराचा भारतीय युवकांना फायदा होणार आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या संधी वाढतील. 

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या करारामुळं तंत्रज्ञान, तंत्रज्ञान सेवा, वित्तीय सेवा, व्यावसायिक सेवा, शिक्षणाशी संबंधित सेवांचा थेट लाभ होईल. 

या करारामुळं भारताच्या श्रमकेंद्री निर्यात क्षेत्र कापड, चामडे, शूज, फर्निचर, रत्न आणि दागिने, तथा खेळाशी संबंधित उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारात करमुक्त पोहोचता येईल.  सध्या ब्रिटन दरवर्षी 23 अब्ज डॉलर्सची अशा प्रकारची उत्पादनं आयात करतं. ज्यामुळं भारतात उत्पादन आणि रोजगारात वाढ होईल.

भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराचा फायदा कृषी, वस्त्रोद्योग, प्लास्टिक्स, मरिन प्रोडक्टस,रसायने आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीचा भारताला फायदा होणार आहे.   सध्या भारतीय उत्पादनांवर ब्रिटनमध्ये सरासरी आयात शुल्क 15 टक्क्यांवर आहे ते  3 टक्क्यांवर मुक्त व्यापार करारानंतर येईल. 
 
लंडनमधील एका डेटानुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील मुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोन्ही देशांमधील एका वर्षातील व्यापार  33 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो. भारतासोबतचा मुक्त व्यापार करार हा मोठा विजय असल्याचं ब्रिटनकडून मानलं जात आहे.    

या मुक्त व्यापार करारामुळं भारतातून ब्रिटनला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क ब्रिटनकडून 99 टक्के ते 100  टक्के कमी होईल.यामुळं भारतीय उत्पादनांना ब्रिटनचा बाजार खुला होईल. तर, भारताकडून देखील ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क 85 ते 90 टक्क्यांनी कमी होईल. 

ब्रिटनमध्ये उत्पादित केलेलं ब्रिटीश मद्य आणि व्हिस्की याच्यावरील टॅरिफ आता 150 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर येईल. या दशकाच्या शेवटपर्यंत ते शुल्क 40 टक्क्यांवर येणं अपेक्षित आहे. भारताकडून ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवरील टॅरिफ 100 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी होतील. 

भारतानं ब्रिटनसोबत केलेल्या व्यापार करारामुळं विदेशी निर्यातदारांसाठी भारतीय बाजार खुला होईल.

मुक्त व्यापार कराराचे फायदे

मुक्त व्यापार करारामुळं भारतीय आयटी, टेक आणि फार्मा कंपन्यांना ब्रिटनमध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या विस्ताराच्या नव्या संधी मिळणार आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक आणि नवी सुरुवात आहे.  यूकेमधील हाय टेक मशीनरी आणि इतर वस्तूंवरील टॅरिफ घटल्यानं भारतातील उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. दोन्ही देशांनी स्टार्टअप, ग्रीन एनर्जी, फिनटेक सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी रोडमॅप केला आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget