एक्स्प्लोर

Donald Trump: भारतात आयफोन बनवाल तर याद राखा..., डोनाल्ड ट्रम्प यांची टीम कूकला धमकी

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात विकल्या जाणाऱ्या आयफोनची निर्मिती देशात झाली पाहिजे असा इशारा दिला आहे. हे होत नसेल तर 25 टक्के टॅक्ससाठी तयार राहा, असं ते म्हणालेत.

Donald Trump न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा संकल्प केलेला आहे. यासाठी ते वेगवेगळे मार्ग वापरुन पाहत आहेत. जगभरातील विविध देशांना टॅरिफचा दणका देऊन त्यास पुन्हा 90 दिवसांची स्थगिती देणाऱ्या ट्रम्प यांनी ट्र्थवरील सोशल अकाऊंटवरुन मोठी घोषणा केली आहे. अमेरीकेचे अध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांची ॲपलला धमकी  दिली आहे. आयफोनचं अमेरिकेबाहेरील उत्पादन थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत आयफोन तयार न केल्यास 25 टक्के टॅरिफसाठी तयार राहण्याचा इशारा देखील दिला आहे. 

आयफोनचे अमेरिकेत उत्पादन न केल्यास कमीतकमी 25 टक्के कर लावला जाणार असल्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी टीम कूकला दिली आहे.  याआधी साऊदीच्या दौऱ्यावर ट्रम्प असताना भारतात आयफोन न बनवता अमेरिकेत बनवण्यासाठी टीम कुक यांना इशारा दिला होता.

अमेरिका सोडून भारत किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आयफोनची निर्मिती करत अमेरिकेत विकल्यास कमीतकमी 25  टक्के कर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. 

भारतात आयफोन बनवाल तर याद राखा 

मी बऱ्याच दिवसांपूर्वी ॲपलच्या टीम कुकला कळवलं होतं की  त्यांनी आयफोनची निर्मिती अमेरिकेत करुन अमेरिकेत विक्री करावी. भारतात नव्हे किंवा इतर कुठल्या ठिकाणी. जर, असं होणार नसेल तर ॲपलला 25 टक्के ट्ररिफ अमेरिकेला द्यावं लागेल. धन्यवाद, या मुद्याकडे लक्ष दिल्याबद्दल आभार, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ॲपलच्या टीम कूक यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी टीम कूक यांना "भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही, भारताला स्वतःचं पाहूद्या." असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. कुक अमेरिकेत आणखी प्लांट्स उभारण्याचा विचार करत आहेत. हे ॲपलच्या याआधीच्या $500 अब्ज गुंतवणुकीच्या वचनाशी सुसंगत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प नवा प्रस्ताव आणणार

अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प वन बिग ब्यूटीफूल बील आणणार आहेत. त्यानुसार अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांना ग्रीन एनर्जीसाठी दिलेलं अनुदान बंद केलं जाईल. याचा परिणाम अमेरिकेत वीज महागण्यावर होणार आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील विविध देशांवर आकारलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. 

दरम्यान, ॲपलचे टीम कूक डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर काय धोरण असणार हे पाहावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर ॲपलच्या भूमिकेकडे उत्सुकता लागली आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
BJP Leader Raj K purohit passes away: भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, 'माझा हक्काचा मित्र आज निघून गेला'
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याचा कारमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांना सापडली चिठ्ठी, मृत्युचे कारण समोर
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
पुण्यातील दोन प्रमुख रस्ते सोमवारी दिवसभर बंद; पुणेकरांना पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
Embed widget