Donald Trump : ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर पाकिस्तानी तज्ज्ञाचा मोठा दावा, म्हणाले, भारताचा मध्यम वर्गच...
Donald Trump Tariff On India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लावला आणि नंतर तो 50 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यावरून आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यात 25 टक्के ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ आणि उर्वरित 25 टक्के रशियाकडून तेल खरेदीबाबतची पेनल्टी आहे. या निर्णयामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेला उधाण आले असून, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबद्दल चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पाकिस्तानी तज्ज्ञ मुक्तेदार खान यांनी भारताला या टॅरिफमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास थांबवणे शक्य नाही. उलट या संधीचा वापर करून भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे ‘रिस्ट्रक्चरिंग’ करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मध्यम वर्ग भारताची ताकद
मुक्तेदार खान म्हणाले, “जगात फक्त तीन देश असे आहेत जे स्वतःच्या बळावर वेगाने प्रगती करू शकतात – अमेरिका, चीन आणि भारत. याचे कारण म्हणजे या देशांकडे प्रचंड मोठा मध्यम वर्ग आहे. भारतात 90 टक्के लोक गरीब असले तरी 10 टक्के श्रीमंत लोकांची संख्या तब्बल 15 कोटी आहे. हीच 15 कोटींची बाजारपेठ अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.”
मुक्तेदार खान पुढे सांगितले की, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनची लोकसंख्या मिळूनही भारतातील मिडल क्लासच्या बरोबरीला येत नाही. त्यामुळे टॅरिफ किंवा निर्यात कमी होण्याच्या भीतीने भारताने मागे हटू नये.
ट्रम्प यांचा भारतावर 50 टक्के टॅरिफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावले. त्यानंतर त्यात वाढ करून तो 50 टक्के इतका केला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचं कारण सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफची घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ बॉम्ब टाकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली. ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींनी टीका केली. शेतकऱ्यांचं हित ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. शेती, पशुपालक, मच्छिमारांच्या हितांशी तडजोड होणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.
परराष्ट्र धोरणात बदल होणार?
रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून टॅरिफ दुप्पट करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. तर दुसरीकडे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाच्या अध्यक्षांची भेट घेतली. या महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदी चीनचा दौरा करणार आहेत. ट्रम्प यांचा तऱ्हेवाईकपणा सांभाळणं आणि दुसरीकडं आपल्या जुन्या मित्रांसोबतचे संबंध वाढवणं हे भारतासमोरचं आव्हान असणार आहे. एकीकडं स्वदेशीचा नारा देत दुसरीकडं नवे व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची दुहेरी पावलं सध्या भारताकडून उचलली जात असल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा:























