एक्स्प्लोर
Advertisement
DAKSH : आरबीआय मॉनिटरिंगसाठी 'दक्ष'; नवी प्रणाली लाँच, काय आहेत याचे फायदे....
RBI DAKSH News: दक्ष हे वेब-आधारित एंड-टू-एंड वर्कफ्लो अॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँका आणि NBFC सारख्या संस्थांवर अधिक लक्ष केंद्रित करून निरीक्षण करू शकेल
RBI DAKSH News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अॅडव्हान्स सुपरवायझरी मॉनिटरिंग सिस्टम 'दक्ष' (DAKSH) लाँच केली. यामुळे आरबीआयची देखरेख प्रक्रिया मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या नव्या प्रणालीबाबत आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की ते देखरेख ठेवण्याच्या क्रियाकलापांना बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे आणि 'दक्ष' हा त्यातला एक नवीन दुवा आहे.
'दक्ष' प्रणाली नेमकी काय?
"दक्ष हे वेब-आधारित एंड-टू-एंड वर्कफ्लो अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँका आणि NBFC सारख्या संस्थांवर अधिक लक्ष केंद्रित करून निरीक्षण करू शकेल," असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
आरबीआयचे हे 'Supertech' ऍप्लिकेशन अखंड संप्रेषण, तपासणी नियोजन आणि अंमलबजावणी, सायबर घटनेचा अहवाल आणि विश्लेषण एकाच प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करेल. जे कुठेही आणि कधीही सुरक्षित वापरता येईल. ही देखरेख प्रणाली तिच्या नावाप्रमाणेच कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करेल असं रिझव्र्ह बँकेने सांगितले आहे.
देखरेख ठेवण्यासाठी एआय आणि मशीन लर्निंगचा वापर
आरबीआयने त्यांच्या विस्तृत डेटाबेसचे विश्लेषण करण्यासाठी बँका आणि NBFCs वर नियामक निरीक्षण सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची योजना आखली आहे. यासाठी आरबीआय बाह्य तज्ज्ञांचीही नियुक्ती करणार आहे. जरी आरबीआय अजूनही आर्टिफिशियल इंटेलीजंस आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरत असली तरी ती अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून सेंट्रल बँकेतील पर्यवेक्षण विभाग अधिक प्रगत करता येईल असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
अलिकडेच आरबीआयकडून यूपीआय वर रुपे क्रेडिट कार्ड लाँच
अलिकडेच आरबीआयकडून यूपीआय वर रुपे क्रेडिट कार्ड लाँच
नुकतेच ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी युपीआय सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले. सध्या या सुविधेचा लाभ पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डच्या वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. या तिन्ही बँकांची रुपे क्रेडिट कार्डे NPCI द्वारे संचालित BHIM अॅपवर लाइव्ह झाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement