(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये चार टक्के वाढ, जाणून घ्या कुणाला मिळणार किती फायदा?
DA Hike : सातव्या वेतन आयोगाच्या आधारावर सर्व केंद्रीय कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना सरकारने खूशखबर दिली
DA Hike : सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission ) आधारावर सर्व केंद्रीय कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना सरकारने खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारनं महागाई भत्ता (Dearness Allowance/Dearness Relief) चार टक्केंनी वाढवला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णायामुळे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चार टक्के वाढ होणार आहे. नियमांनुसार, DA म्हणजेच महागाई भत्ता एक जुलै 2022 पासून लागू होणार आहे. केंद्रीय कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना जुलैपासून आतापर्यंतची सर्व थकबाकी (Arrears) देण्यात येईल.. (Utility News In Marathi)
महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance/Dearness Relief) चार टक्केंनी वाढ झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्यांना मासिक अथवा वार्षिक किती लाभ होणार आहे, ते पाहूयात..
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18000 रुपये आहे. त्यांना DA मुळे प्रत्येक महिन्यात 720 रुपयांची वाढ होणार आहे. वर्षाला त्या कर्मचाऱ्याला 8 हजार 640 रुपये अधिक मिळणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 20 हजार रुपये आहे. त्यांना प्रत्येक महिन्याला 800 रुपये वाढवून मिळतील तर वर्षाला 9 हजार 600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 25 हजार रुपये असेल, त्यांचा पगार महिन्याला एक हजार रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत.
जर बेसिक पगार 30 हजार रुपये असेल, तर प्रति महिन्याला 1200 रुपयांची वाढ होईल आणि वर्षाला 14 हजार 400 रुपये जास्त मिळणार आहेत.
तुमचा बेसिक पगार 40 हजार रुपये असेल तर डीएचा मासिक लाभ 1,600 रुपये आणि वार्षिक लाभ 19,200 रुपये इतका असेल. त्याचप्रमाणे 50,000 बेसिक पगर असणाऱ्यांना डीएमुळे प्रति महिना दोन हजारांची वाढ तर वार्षिक वाढ 24 हजार रुपये इतकी असेल...
बेसिक पगार | सध्याचा डीए 34 टक्के | डीएमध्ये 4 टक्के वाढ | एकूण डीए 38 टक्के | वार्षिक लाभ |
18000 | 6120 | 720 | 6840 | 8640 |
20000 | 6800 | 800 | 7600 | 9600 |
25 000 | 8500 | 1000 | 9500 | 12000 |
30000 | 10200 | 1200 | 11400 | 14400 |
40000 | 13600 | 1600 | 15200 | 19200 |
50000 | 17000 | 2000 | 19000 | 24000 |
60000 | 20400 | 2400 | 22800 | 28800 |
70000 | 23800 | 2800 | 26600 | 33600 |
80000 | 27200 | 3200 | 30400 | 38400 |
90000 | 30600 | 3600 | 34200 | 43200 |
100000 | 34000 | 4000 | 38000 | 48000 |
150000 | 51000 | 6000 | 57000 | 72000 |
200000 | 68000 | 8000 | 76000 | 96000 |
दरम्यान, केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते. एक जानेवारी आणि एक जुलै रोजी महागाई भत्त्यावर संशोधन केलं जाते. त्यानंतर याची घोषणा मार्च अथवा सप्टेंबरमध्ये केली जाते.
31 डिसेंबर, 2019 पर्यंत 7th Pay Commission च्या आधारावर वेतन घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 17 टक्कें महागाई भत्ता मिळत होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष कोरोनामुळे महागाई भत्त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता 11 टक्केंनी वाढवण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली. याला एक जुलै 2021 पासून लागू करण्यात आले.
सर्व कर्मचाऱ्यांना वेतन अथवा पेन्शनधारकांना पेन्शन डीए एक जुलै 2021 पासून 31 टक्केंच्या दराने मिळत होता. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ कऱण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. आता यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 38 टक्के दराने सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्यात येईल.