(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crypto Currency Trade: जगभरातील गुंतवणुकदारांचे 40 अब्ज डॉलर बुडाले; क्रिप्टो बाजारातून हे चलन झाले डिलिस्ट
Crypto Currency News: क्रिप्टो करन्सी असलेल्या टेरा लूनामध्ये मोठी घसरण झाली असून मूल्य कवडीमोल झाले आहे. मागील काही दिवसात क्रिप्टो बाजारात मोठी घसरण सुरू आहे.
Crypto Currency: क्रिप्टोकरन्सी बाजारात मागील काही दिवसात मोठी घसरण दिसून आली. या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. क्रिप्टो बाजारातील टेरा लूना हे चलन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. टेरा लूनामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका आठवड्यातच या क्रिप्टो चलनातील सर्वच गुंतवणूक बुडाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिप्टो बाजारातून टेरा लूना डिलिस्ट केले आहे.
कधी काळी टेरा लूना या आभासी चलनाची किंमत 118 डॉलर इतकी झाली होती. हा दर या चलनाचा उच्चांक आहे. क्रिप्टो चलन बाजार कोसळल्यानंतर त्यांची किंमत आता अवधी काही सेंट राहिले आहे. गुंतवणुकदारांची सर्व गुंतवणूक बुडाली आहे. टेरा लूनामुळे गुंतणुकदारांचे 40 अब्ज डॉलर बुडाले आहेत. मागील 24 तासात या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य 99 टक्क्यांनी घसरली आहे.
CoinMarketCapच्या आकेडवारीनुसार, मागील एका महिन्यात क्रिप्टोकरन्सी बाजाराचे मूल्य 800 अब्ज डॉलरने घटले आहे. मागील काही दिवसांपासून क्रिप्टो बाजारात घसरण सुरू आहे.
क्रिप्टो एक्सचेंज वजीरएक्सने सांगितले की, त्यांनी लूना/युएसडीटी, लूना/आयएनआर आणि लूना/डब्लूआरएक्स या क्रिप्टो चलनाला आपल्या प्लॅटफॉर्मवरून डिलीस्ट केले आहे. गुंतवणुकदार कोणत्याही शुल्काशिवाय लूना फंड्स काढू शकतात. USDT स्टेबलकॉइन असून WRX वजीरेक्स युटिलिटी टोकन आहे.
वजीरेक्स शिवाय, जेबपे, कॉइनडीसीएक्स या क्रिप्टो एक्सचेंजदेखील टेरा लूनाला आपल्या यादीतून हटवले आहे.
दरम्यान, जियोटस (Giotuss)या क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर टेरा लुना क्रिप्टो करन्सी उपलब्ध आहे. जियोटसचे सीईओ विक्रम सुब्बुराज यांनी सांगितले की जर टेरा ब्लॉकचेन पुन्हा सुरू होणार असेल तर काही गोष्टी बदलू शकतात.
क्रिप्टो बाजारात झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर टेरा लूना आपल्यासाठी नवीन पर्याय शोधून पुन्हा वाटचाल करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता याची शक्यता खूपच कमी असल्याचे म्हटले जात आहे.