(Source: Poll of Polls)
Stock Market : 'शेअर बाजाराच्या दृष्टीने करेक्शन होणं ही चांगली बाब', मार्केटमधील चढ-उतारावर गुंतवणूक सल्लागारांची माहिती
63 स्मॉल-कॅप शेअर्स 10 ते 22 टक्क्यांनी घसरले आहेत. परंतु, शेअर मार्केटमध्ये करेक्शन होणं आवश्यक होतं. त्यामुळे हे करेक्शन होत आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने करेक्शन होणं ही चांगली बाब आहे, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी दिली.
Stock Market : गेल्या 20 दिवसांपासून शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. 63 स्मॉल-कॅप शेअर्स 10 ते 22 टक्क्यांनी घसरले आहेत. छोट्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून स्टॉक्स वरती जात होते. परंतु, सध्या शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत होते. परंतु, शेअर मार्केटमध्ये करेक्शन होणं आवश्यक होतं. त्यामुळे हे करेक्शन होत आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने करेक्शन होणं ही चांगली बाब आहे, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक यांनी दिली आहे. एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात बोलताना निखिल नाईक यांनी ही माहिती दिली.
2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून आजपर्यंत शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करायची की नाही? या संभ्रमावस्थेत आहेत. याच विषयावर एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात निखिल नाईक यांनी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती सांगितली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. एमएफआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतात पाच कोटी एसआयपी खाती आहेत. तर जानेवारी 2022 मध्ये म्युच्युल फंडात 11 लाख नवे गुंतवणूकदार आले आहेत. यावर बोलताना निखिल नाईक म्हणाले, गेल्या एक-दोन वर्षांतील परतावा पाहून गुंतवणूकदार गुंतवणुकीकडे वळत असतात. त्यामुळे लाखो नवीन लोकांनी डीमॅट खाती उघडली आहेत. याबरोबरच गुंतवणुकीच्या पद्धतीत बदल होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा म्युच्यल फंडाकडे कल वाढला आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घ काळाचा विचार करून गुंवणूक केली पाहिजे, अशी माहिती निखिल नाईक यांनी दिली.
गुंतवणूकदारांचा क्रिप्टोकरन्सीकडंही कल आहे. परंतु, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर 30 टक्के कर आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो करन्सीला कोणतंही मुलभूत मुल्य नसतं, असे आरबीआयच्या गव्हर्नरांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मोठा कर लावत क्रिप्टोपासून दूर ठेवण्यासाटी केंद्रानं या अर्थसंकल्पात क्रिप्टोच्या नफ्यावर 30 टक्के कर आकारला आहे.
येत्या मार्च महिन्यात एलआयसीचा आयपीओ बाजारात येतोय. गुंतवणूकदारांना सध्या त्याची प्रतिक्षा आहे. यावर बोलताना नाईक म्हणाले, मोठा आयपीओ बाजारात येतो त्यावेळी गुंतवणूकदार यात पैसे गुंतवत असतात. आयपीओला कासा प्रतिसाद मिळतोय यावरूनच त्याच्यावर बोलता येणार आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत!
महत्वाच्या बातम्या
- Stock Market : शेअर मार्केटमध्ये चढ-उतार, पण दीर्घ काळ गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा, काय सांगतात गुंतवणूक सल्लागार?
- नव्या वर्षाची सुरुवात करताना गुंतवणुकीचा आढवा, काय पूर्वतयारी कराल!
- Currency News : तुमच्याकडे असलेली 100 रुपयांची नोट ठरेल 'लाख'मोलाची; होईल मोठा फायदा, जाणून घ्या
- Online Fraud : फक्त एक कोड अन् बँक खातं पूर्ण रिकामं; SBI चा इशारा, वाचा पूर्ण अहवाल